खळबळजनक! पतीच्या मृतदेहाचे तुकडे करुन गेली फिरायला, खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न अन्....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:16 IST2025-03-19T14:15:55+5:302025-03-19T14:16:41+5:30
एका पत्नीने पतीची हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला.

खळबळजनक! पतीच्या मृतदेहाचे तुकडे करुन गेली फिरायला, खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न अन्....
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका पत्नीने पतीची हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. पत्नीने तिच्या प्रियकरासह मिळून पतीच्या मृतदेहाचे १५ तुकडे केले आणि ते एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरले. मेरठच्या सौरभ राजपूतसोबत हे भयंकर घडलं आहे. जो मर्चंट नेव्हीमध्ये काम करायचा. यावेळी सुट्टीवर घरी आल्यानंतर त्याच्यासोबत असं काही घडलं ज्याचा त्याने कधीही विचार केल नसेल. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभची हत्या केल्यानंतर मुस्कान तिच्या प्रियकरासोबत मनालीला फिरण्यासाठी गेली होती असं तपासात समोर आलं आहे. या काळात, तिने तिच्या परिसरात ती नवऱ्यासोबत फिरायला गेल्याचं खोटं सांगितलं. पोलिसांना किंवा इतर कोणालाही त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून तिने हे केले. पण मनालीला जाण्यापूर्वी तिने तिच्या पतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, ते एका ड्रममध्ये ठेवले आणि त्यात सिमेंट भरलं.
पोलिस तपासात असं समोर आलं आहे की, आरोपी मुस्कान आणि तिचा प्रियकर मनालीमध्ये अनेक दिवस राहिले होते. या काळात, जेव्हा त्यांचे पैसे संपू लागले तेव्हा त्यांनी सौरभच्या खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. सौरभच्या खात्यात सहा लाख रुपये होते आणि मुस्कानला याची माहिती होती. मात्र तिला साहिलसह पैसे काढण्यात यश आलं नाही.
हिमाचलमध्ये राहत असताना, जेव्हा मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांचे पैसे संपले, तेव्हा त्यांनी आधी सौरभच्या खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा ते तसे करू शकले नाहीत, तेव्हा मुस्कान तिच्या आईच्या घरी पोहोचली. तिथे तिने तिच्या आईकडे काही पैसे मागितले पण जेव्हा तिच्या आईने तिला सौरभबद्दल विचारले तेव्हा ती सुरुवातीला गप्प राहिली आणि नंतर तिच्या आईला त्याच्या हत्येची संपूर्ण कहाणी सांगितली. सौरभच्या हत्येबद्दल ऐकून मुस्कानच्या आईला धक्का बसला. मुस्कानच्या आईने तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी जेव्हा मुस्कान आणि तिच्या प्रियकराला सौरभचा मृतदेह कुठे आहे याबद्दल विचारपूस केली तेव्हा त्यांनी पोलिसांना सांगितलं की, मृतदेह त्यांच्या घरात एका ड्रममध्ये आहे. यानंतर, पोलीस पथक दोघांनाही मुस्कानच्या फ्लॅटवर घेऊन गेले. घराची झडती घेण्यात आली आणि त्या झडतीदरम्यान पोलिसांना एका खोलीत एका ड्रममध्ये सौरभचा मृतदेह आढळला. पण सिमेंट ओतल्यामुळे मृतदेह बाहेर काढणं शक्य झालं नाही.