सौरभ हत्याकांडानंतर आता मेरठमधील आणखी एका खळबळजनक घटना समोर आली आहे. पत्नीने तिच्या बॉयफ्रेंडसह मिळून पतीची गळा दाबून हत्या केली. यानंतर हत्या केल्याचं समजू नये म्हणून पतीच्या मृतदेहाजवळ एक साप ठेवण्यात आला जेणेकरून असं दिसून येईल की, साप चावल्याने मृत्यू झाला आहे, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं. अमितचा साप चावण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी अमितची पत्नी रविता आणि तिचा बॉयफ्रेंड अमरदीप यांना अटक केली आहे. आता या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत.
रविताने दिलेल्या माहितीनुसार, अमित तिला दररोज मारहाण करायचा आणि धमकीही द्यायचा. अमितने स्वतः माझी अमरदीपशी ओळख करून दिली आणि नंतर म्हणायचा की, मी अमरदीपला फोन करेन. तू त्याला मारण्यात मला मदत करशील आणि नंतर मी तुलाही मारेन. जसं त्याने आम्हाला सांगितलं होतं आम्ही ते त्याच्यासोबतच केलं. अमरदीपने अमितचा गळा दाबला होता. मी त्याचे हात आणि तोंड धरलं होतं. अमरदीपने साप विकत घेतला होता आणि आम्ही तो अमितच्या मृतदेहाजवळ ठेवला होता.
आठ वर्षांपूर्वी झालेलं लग्न
मेरठच्या बहसुमा पोलीस स्टेशन परिसरातील अकबरपूर सादात गावात ही घटना घडली आहे. येथे राहणारा अमित हा एक मजूर होता. आठ वर्षांपूर्वी त्याचं लग्न रविता नावाच्या महिलेशी झालं होतं. तीन लहान मुलं देखील होती. सुरुवातील सर्व ठीक सुरू होतं, पण नंतर परिस्थिती बदलली. रविता गावातील अमरदीप नावाच्या एका तरुणाशी जवळीक साधू लागली, जो अमितचाच मित्र होता.
अमितचा गळा दाबून खून
हळूहळू रविता आणि अमरदीपमधील हे नातं प्रेमात रूपांतरित झालं. जेव्हा अमितला हे कळलं तेव्हा त्याने विरोध केला. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होऊ लागली. पण रविताने त्याच्याशी कधीच जास्त वाद घातला नाही. तिने तिच्या पतीला मारण्याचा कट रचण्यास सुरुवात केली. शेवटी अमरदीपसोबत मिळून अमितचा गळा दाबून खून केला आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अमितच्या मृतदेहाजवळ एक साप ठेवला. यामुळेच सुरुवातीला सर्वांना वाटलं की अमितचा मृत्यू साप चावल्याने झाला आहे परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्टपणे दिसून आलं की, अमितचा गळा दाबून खून करण्यात आला आहे.
नवऱ्याचा काटा काढला अन् बेडवर साप ठेवला, कारण...; बायकोचा विषारी प्लॅन, असा झाला पर्दाफाश
पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने स्वतःला वाचवण्यासाठी मुस्कान आणि साहिलसारखा भयानक कट रचला. मात्र यावेळी निळ्या ड्रमऐवजी, एका सर्पमित्राकडून साप विकत घेण्यात आला. पतीची हत्या केल्यानंतर पत्नी रविता हिने नवऱ्याच्या बेडवर साप सोडला. नंतर असा दावा करण्यात आला की, तरुण झोपेत असताना त्याला १० वेळा साप चावला आणि त्याचा मृत्यू झाला. पण पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये सत्य बाहेर आले.