टी सिरीजचे एम.डी. भूषण कुमारवर बलात्काराचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 12:38 IST2021-07-16T12:37:43+5:302021-07-16T12:38:58+5:30

आगामी प्रोजेक्टमध्ये तिला काम मिळवून देण्याचे सांगत त्यांनी फायदा उचलल्याचे तिचे म्हणणे आहे

M.D. of T series. Bhushan Kumar charged with rape | टी सिरीजचे एम.डी. भूषण कुमारवर बलात्काराचा गुन्हा

टी सिरीजचे एम.डी. भूषण कुमारवर बलात्काराचा गुन्हा

ठळक मुद्देटी सिरीज या प्रसिद्ध म्युझिक कंपनीचे मालक भूषणकुमार यांच्यावर एका 30 वर्षीय मॉडेलने बलात्काराचा आरोप केला आहे. पीडिताने तीन लोकेशनचा दावा सांगत, संबंधित ठिकाणी आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मुंबई - टी सिरीज म्युझिक कंपनीचे एम डी भुषण कुमार यांच्यावर एका मॉडेलने बलात्काराचा आरोप केला आहे. त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तिला काम मिळवून देण्याचे सांगत त्यांनी फायदा उचलल्याचे तिचे म्हणणे आहे. त्यानुसार, याप्रकरणी डी. एन. नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास सुरू आहे.

टी सिरीज या प्रसिद्ध म्युझिक कंपनीचे मालक भूषणकुमार यांच्यावर एका 30 वर्षीय मॉडेलने बलात्काराचा आरोप केला आहे. पीडिताने तीन लोकेशनचा दावा सांगत, संबंधित ठिकाणी आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. भूषणकुमार यांनी 3 वर्षे आपले लैंगिक शोषण केले. सन 2017 पासून 2020 पर्यंत त्यांनी तिच्याशी गैरकृत्य केल्याचं तिने म्हटलं आहे. दरम्यान, 2018 मध्येही मीटू कॅम्पेनवेळीही भूषणकुमार यांच्यावर एका मॉडेलने बलात्काराचा आरोप केला होता. भूषणकुमार हे टी सिरीजचे एमडी असून अनेक मोठ्या फिल्मचे निर्मातेही आहेत.  
 

Web Title: M.D. of T series. Bhushan Kumar charged with rape