भयंकर! माजी नगरसेविकेची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 16:26 IST2021-02-11T16:21:23+5:302021-02-11T16:26:30+5:30
Crime News : परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

भयंकर! माजी नगरसेविकेची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ
नवी दिल्ली - देश कोरोना व्हायरससारख्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. भररस्त्यात माजी नगरसेविकेची हत्या करण्यात आली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये ही घटना घडली आहे. अज्ञातांनी माजी नगरसेविकेवर गोळ्या झाडून तिची हत्या केली आहे.
मीरा ठाकूर असं या माजी नगरसेविकेचं नाव होतं. हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला असून सध्या ते फरार आहेत. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अज्ञातांनी गोळ्या झाडल्यामुळे जागीत ठाकूर यांचा मृत्यू झाला आहे. ठाकूर आपल्या मुलीसोबत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. मात्र सुदैवाने या हल्ल्यात त्यांची मुलगी वाचली आहे. दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यासह दोघांवर या प्रकरणात कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याचा आरोप, घटनेने खळबळhttps://t.co/dUQL9n8umk#Rape#crime#crimesnews
— Lokmat (@MiLOKMAT) February 9, 2021
मीरा ठाकूर यांच्या हत्येनंतर परिसरात दहशत निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे. तसेच मीरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या भावावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची भयंकर घटना समोर आली होती. भररस्त्यात अज्ञातांनी सुशांतच्या भावासह आणखी एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या होत्या. सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह आणि त्याच्या एका सहकाऱ्यांवर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या होत्या.
भयंकर! सुशांत सिंह राजपूतच्या भावावर जीवघेणा हल्ला, भररस्त्यात घातल्या गोळ्या
राजकुमार सिंह आणि त्यांचे साथीदार असलेल्या अमीर हसन यांना गोळ्या घालण्यात आल्या. या हल्ल्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. सुशांत सिह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह यांचं मधेपुरा येथे मोटारसायकल शोरूम आहे. मधेपूरा येथे शोरूम उघडण्यासाठी जात असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. राजकुमार सिंह मधेपूरा येथे शोरूम उघडण्यासाठी जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गाडीला ओव्हर टेक करत गोळीबार केला होता.
माणुसकीला काळीमा! वृद्धेवर सामूहिक बलात्कार, आरोपी फरारhttps://t.co/ThDOOBSDsE#Rape#crime#crimesnews
— Lokmat (@MiLOKMAT) February 5, 2021