पिंपरीत वाहनचोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ; नागरिकांमध्ये भीती व चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 06:58 PM2020-08-26T18:58:29+5:302020-08-26T18:58:39+5:30

दररोज किमान तीन ते चार वाहनचोरीच्या घटना; पोलीस चोरांच्या मुसक्या कधी आवळणार असा प्रश्न उपस्थित 

With the massive increase in vehicle thefts in Pimpri, the question arises as to when the thieves will be caught | पिंपरीत वाहनचोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ; नागरिकांमध्ये भीती व चिंता

पिंपरीत वाहनचोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ; नागरिकांमध्ये भीती व चिंता

Next

पिंपरीत वाहनचोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ, चोरांच्या मुसक्या आवळणार कधी असा प्रश्न उपस्थित 
पिंपरी  उद्योगनगरीतील वाहनचोरींच्या रोज नवीन घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भय व चिंता पसरली आहे. दररोज किमान तीन ते चार घटना वाहनचोरीच्या असल्याने पोलीस वाहनचोरी करणाऱ्यांच्या मुसक्या कधी आवळणार असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. दिवसाढवळया बाजारपेठा, सोसायटी, उद्याने, मंदिरे, यांच्यासमोर लावलेली वाहने चोरी होत असल्याने दुचाकी आणि चारचाकीचालक चांगलेच धास्तावले आहेत. बुधवारी शहरात तीन दुचाकी चोरीला गेल्याने अज्ञात वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       एका कार शो रुम समोरुन बुलेट गाडी चोरीला गेल्याची घटना सोमवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी शशिकांत अरुण चोपडे (वय ३१, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांची बुलेट एका कार शो रुमच्या पार्किंगमधून चोरीला गेली आहे.

दुसरी घटना भोसरी येथे घडली असून त्याप्रकरणी संतोष श्यामबिहारी शर्मा (वय ४२, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची एका कंपनीची दुचाकी लॉकक रुन भोसरीतील पूलाखाली पार्किंग केली होती. कुण्या एका अज्ञात चोरट्याने लॉक तोडून ती मोटारसायकल पळवल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

२३ ते २४ ऑगस्ट दरम्यान सकाळी अकराच्या सुमारास तळेगाव दाभाडे याठिकाणाहून फिर्यादी जितेंद्र चिलाजी मराठे (वय ३४, रा. वराळे, मावळ) यांची दुचाकी चोरीला गेली आहे. त्यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा भाऊ उपचार घेण्यासाठी दवाखान्यात गेले असताना तळेगाव येथील जनरल हॉस्पिटल समोर लॉक करुन पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली.

वाहनचोरीच्या वाढत्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहनचोऱ्या करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. एकीकडे कोरोनाचे वाढते संकट यामुळे आर्थिक प्रश्न निर्माण झाले असताना दुसरीकडे सततच्या चोरीच्या घटनांनी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहनचोऱ्या करणारी टोळी शहरातील आहे की यात परराज्यातून आलेल्या व्यक्तींचा हात आहे, दररोज चारपेक्षा अधिक वाहने चोरीला जात असताना पोलिसांकडून अद्याप कुठलीही ठोस कारवाई केली गेली नसल्याचे समोर आले आहे. केवळ दुचाकीच नव्हे तर चोरीला जाण्यात चारचाकींची संख्याही अधिक आहे.

* वाहनचोर आहेत अधिक  ‘स्मार्ट’
ज्याचे वाहन चोरायचे त्याच्यावर पाळत ठेऊन दोन ते तीन दिवसांनी वाहनचोरी होत असल्याची प्राथमिक माहिती आतापर्यंतच्या घटनांमधून दिसून येते. विशेष म्हणजे दुचाकी लॉक केली असतानाही मोठ्या शिताफीने त्याचे लॉक तोडून दुचाकी लांबविण्याचे प्रमाण वाढले आहे. चारचाकी वाहनांना सेन्सॉर अलर्ट यंत्रणा असूनही ती ब्रेक करण्यात चोरटे अधिक ‘स्मार्ट’ झाले आहेत. अत्याधुनिक साधने, अद्यावत यंत्रणा याच्या साहयाने याप्रकारच्या चो-या शिताफीने केल्या जात आहेत. 
 

Web Title: With the massive increase in vehicle thefts in Pimpri, the question arises as to when the thieves will be caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.