शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नवरा, दीर, सासऱ्याकडून सामूहिक अत्याचार; लग्नाच्या नावाआड नागपूरच्या तरुणीची जळगावात विक्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 22:03 IST

Crime News : या संतापजनक घटनेचा मंगळवारी उलगडा झाला असून पारडी पोलिसांनी या प्रकरणात दलालांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

ठळक मुद्देपीडित तरुणी २३ वर्षाची असून ती भांडेवाडीत राहते. तिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत आहे.

नागपूर : भांडेवाडी पारडीतील एका तरुणीचे लग्न करून देण्याच्या नावाखाली भंडारा जिल्ह्यातील दलालांनी तिला जळगाव जिल्ह्यात दीड लाखात विकले. तिला विकत घेणाऱ्या कुटुंबातील दोन मुले आणि बापाने या तरुणीवर तब्बल ३० दिवस सामूहिक अत्याचार केला.  या संतापजनक घटनेचा मंगळवारी उलगडा झाला असून पारडी पोलिसांनी या प्रकरणात दलालांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

पीडित तरुणी २३ वर्षाची असून ती भांडेवाडीत राहते. तिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली, तुमसर आणि देवरी येथील तीन दलालांनी जानेवारी महिन्यात पीडित तरुणीच्या पालकांशी संपर्क साधला. सधन कुटुंबात मुलीचे लग्न लावून देतो, अशी थाप मारून या भामट्यांनी मुलीला जळगाव जिल्ह्यातील पारोडा येथे नेले. तेथे ३ फेब्रुवारीला पाटील परिवाराला एक लाख ६० हजार रुपयात तरुणीला विकले. त्याचवेळी तिचे २७ वर्षीय जगदीश सुका पाटील याच्याशी लग्न लावून दिले. लग्नाच्या चार-पाच दिवसानंतर रात्री सदर तरुणी झोपून असताना नवरा उठून गेला आणि तिचा दीर तिच्याजवळ आला. त्याने तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी तिने ही बाब नवऱ्याला सांगितली असता त्याने 'हरकत नाही' म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पुढचे चार-पाच दिवस पंकज नामक दीर तिचा विरोध मोडून काढत रोज बलात्कार करू लागला. या घटनेच्या दोन तीन दिवसानंतर तिला दुसरा जबर धक्का बसला. तिचा सासरा रात्रीच्या वेळेस तिच्याकडे आला आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे तरुणी हादरली. तिने आपल्या सासूला हा प्रकार सांगितला असता तिने काही होत नाही, असे म्हणत तिच्याकडे लक्ष दिले नाही.  यानंतर या प्रकाराची बाहेर वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपींनी तरुणीचा छळ करणे सुरु केले. तिला डांबून ठेवणे, पुरेसे जेवण न देणे, असाही प्रकार सुरू झाला.किती जणांशी लावले लग्न? २ मार्चला तरुणीने संधी साधून वडिलांना फोन केला. यावेळी तिला तिच्या भावना अनावर झाल्या होत्या. तुम्ही माझे लग्न किती लोकांसोबत लावून दिले, असा सवाल करत तिने आपली कर्मकथा पित्याला ऐकवली. ती ऐकून तरुणीचे वडील लगेच टेहू (जि. जळगाव)ला पोहोचले. त्यांनी आपल्या मुलीला सोबत नेण्याची तयारी केली असता आरोपी पाटील बापलेकांनी आधी आमचे एक लाख ६० हजार रुपये परत करा नंतर मुलीला न्या, असे म्हणत धमकावणे सुरू केले. मुलीच्या वडिलांनी गावकऱ्यांना हा गैरप्रकार सांगितला. पापाचा बोभाटा होत असल्याचे पाहून आरोपी नमले. त्याच दिवशी (४ मार्च) त्यांनी पारोळा (जि. जळगाव) पोलीस ठाण्यात मुलीसह जाऊन या अत्याचाराची तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी जगदीश सुका पाटील, पंकज सुका पाटील आणि सुका सदा पाटील (सर्व रा. टेहू, ता. पारोळा, जि. जळगाव) यांच्याविरुद्ध बलात्कार करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर पीडित तरुणी आपल्या वडिलांसोबत नागपुरात परतली.दलालांनी झटकले हात लग्न लावून दिल्याच्या नावाखाली ओळखीच्या आरोपींनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे तरुणीच्या पित्याने साकोली, तुमसर आणि देवरी गाठून दलालांकडे विचारपूस केली असता त्यांनी असंबंध उत्तरे देऊन हात झटकले. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी सामाजिक कार्यकर्ते नरेश जुमानी, उमेश प्रधान, कांताभाई वाघेला, सतीश भुरे, निलेश सतीबावणे, प्रवीण मकवाना आणि अंकुश  भोवते यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी आज सायंकाळी तरुणीच्या वडिलांसह पारडी पोलीस ठाणे गाठले. तेथे लग्नाच्या नावाखाली उपरोक्त दलालांनी फसवणूक केल्याची तक्रार तरुणीच्या पित्याने नोंदवली. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात दलालांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरPoliceपोलिसMolestationविनयभंगmarriageलग्न