पिंपरीत चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 20:06 IST2019-03-30T20:04:50+5:302019-03-30T20:06:01+5:30

चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Married women tortured by husband in pimpri | पिंपरीत चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ  

पिंपरीत चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ  

पिंपरी : चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पूर्णानगर चिंचवड येथील शनि मंदिराजवळ राहणाऱ्या एका कुटुंबातील पती, सासू व नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विवाहितेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवाहितेचा पती परदेशात नोकरीला असून लग्नापुर्वी त्याने विवाहितेला ह्यतु माज्याशी लग्न कर तुला काम करायची गरज नाहीह्ण असे सांगितले होते. मात्र, लग्नानंतर चारित्र्यावर संशय घेत ह्यतु कोणापासून गरोदर आहेस, ते मूल माझे नाही, असा संशय घेत विवाहितेचा छळ सुरु केला. विवाहिता ऑफिसला निघाली असता तिच्याकडील मोबाईल व गाडीची चावी काढून घेतली. त्यानंतर विवाहितेने चावी मागितली असता आरोपींनी त्यांच्या हातावर, पाठीवर, तोंडावर व पायावर मारहाण केली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Married women tortured by husband in pimpri