शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

आधी 'Love', आता 'Hate'! तुझ्या हातचा स्वयंपाक खाणार नाही; विवाहितेच्या पोटात लाथा मारून गर्भपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 19:40 IST

तिघांना दिली एन्काउंटरची धमकी, पतीसह नऊ जणांविरोधात अंबाजोगाईत गुन्हा दाखल

बीड - अंबाजोगाईच्या तरुणीने सोलापूरच्या तरुणासोबत 'लव्ह मॅरेज' केले. परंतु पहिल्या वर्षातच तिची 'जात' काढून छळ सुरू झाला. तिच्या पोटात लाथा मारून गर्भपात केला. त्यानंतर नातेवाइकांनी विवाहितेसह तिचा मुलगा आणि वडिलांना एन्काउंटर करण्याची धमकी दिली. सुरुवातीला 'लव्ह' करणारे हे जोडपे आता एकमेकांना 'हेट' करत आहेत. हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले असून, पतीसह नऊजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

बीडच्या अंबाजोगाईची ही तरूण सोलापूरच्या युवकाच्या प्रेमात पडली. दोघांनी एप्रिल २०१७ मध्ये आंतरजातीय विवाह केला. लग्नानंतर युवती  गर्भवती राहिली. सोनोग्राफी केल्यावर तिळे असल्याचे समजले. त्यानंतर सासू-सासऱ्यांसह इतरांनी गर्भपात कर आणि तिला घटस्पोट दे. तिचा सून म्हणून आम्ही स्वीकार करणार नाहीत. तू आपल्या जातीच्या मुलीशी लग्न कर, तू आमचा एककुलता एक मुलगा असल्याने तुला आमची प्रॉपर्टीमध्ये हिस्सा भेटणार नाही असं युवकाला सांगितले. 

गर्भपात केला नाहीस तर तुला प्रॉपर्टीमध्ये हिस्सा भेटणार नाही. तुला हिस्सा पाहिजे असेल तर तू तुझ्या पत्नीला हाकलून दे असेही म्हणाले. त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ करत गर्भवती युवतीच्या पोटात लाथा मारल्या, यात युवतीला वेगळी भाड्याने खोली करून दिली. दरम्यानच्या काळात तिला एक मुलगा झाला. परंतु तिचा छळ थांबला नाही. त्यानंतर आणखी छळ सुरू झाला. तुला नांदायचे असेल तर तुझे आई वडिलांकडून २५ तोळे सोने व २५ लाख रुपये रोख घेऊन ये नाहीतर मी तुला नांदवणार नाही, असे म्हणून मला मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या असा आरोप युवतीने केला. युवतीच्या अगावरील सर्व दागिनेही विक्री केले. 

दरम्यान, २० ऑगस्ट २०२४ रोजी युवती आणि तिच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली. त्यानंतरही समेट न झाल्याने युवतीने अखेर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानंतर नऊजणांविरोधात गुन्हा दाखल झाला. 

तुझ्या हातचा स्वयंपाक खाणार नाहीत

२ एप्रिल २०२४ रोजी मुलाच्या कस्टडीसाठी युवती, युवक आणि तिच्या सासरचे लोक अंबाजोगाईला आले होते. युवती ही झेरॉक्स काढायला जात असताना युवकाने थांबविले व हात पिरगाळला. युवकाची बहीण तेथे आली आणि तुझ्यासारखे वेगळ्या जातीचे कधीच घरात घेणार नाही. तुझ्या हातचा स्वयंपाक खाणार नाहीत व तू काहीही हुंडा घेऊन आली नाहीस असं म्हणत शिवीगाळ केली. तर तिच्या पतीने एन्काउंटर करण्याची धमकी दिली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी