थोरलीशी विवाह; धाकटीवर जडला जीव! लग्नासाठी मेहुणी, सासूवर केला कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 16:24 IST2022-07-25T16:23:04+5:302022-07-25T16:24:12+5:30

Stabbing Case : याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी जावयाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

Marriage to elder; love on the younger! wife's sister, mother-in-law stabbed for marriage | थोरलीशी विवाह; धाकटीवर जडला जीव! लग्नासाठी मेहुणी, सासूवर केला कोयत्याने वार

थोरलीशी विवाह; धाकटीवर जडला जीव! लग्नासाठी मेहुणी, सासूवर केला कोयत्याने वार

खामगाव (बुलढाणा) : थोरलीशी विवाह केल्यानंतर पत्नीच्या धाकट्या बहिणींवर जावयाचा जीव जडला. त्यामुळे त्याने तिच्याशीही विवाह करण्यासाठी सासू आणि मेहुणीवर दबाव वाढविला. दोघींनीही लग्नास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या जावयाने सासू आणि मेहुणीवर कोयत्याने वार केले. ही घटना खामगाव शहरानजीक असलेल्या एका गावात रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी जावयाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील गावातील वृद्ध महिलेच्या थोरल्या मुलीचा जळगाव खानदेश जिल्ह्यातील एका गावातील असलेल्या आरोपीशी विवाह झाला. विवाह झाल्यानंतर जावयाचा पत्नीच्या धाकट्या बहिणीवर जीव जडला. त्यामुळे त्याने नात्याचा कोणताही विचार न करता, धाकटीशी विवाह लावून देण्यासाठी वृद्ध सासूवर दबाव आणला. तसेच मेहुणीला सोबत येण्यासाठी धमकी दिली. सासूने लग्नास नकार दिल्याने जावई आणि सासूमध्ये वाद झाला. चिडून जावयाने सासूवर कोयत्याने वार केले. यावेळी वाद सोडविण्यास गेलेल्या मेहुणीवरही त्याने वार केले. याप्रकरणी तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून ग्रामीण पोलिसांनी जावयाविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Marriage to elder; love on the younger! wife's sister, mother-in-law stabbed for marriage