मराठी अभिनेत्रीचा विनयभंग; शिवीगाळ करत मद्यपीने केली मारहाण
By पूनम अपराज | Updated: February 28, 2021 21:19 IST2021-02-28T21:18:02+5:302021-02-28T21:19:16+5:30
Marathi actress abused : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मद्यपान केलेल्या अवस्थेत होता.

मराठी अभिनेत्रीचा विनयभंग; शिवीगाळ करत मद्यपीने केली मारहाण
ठळक मुद्देगोरेगाव पोलिसांकडून भादंवि कलम 354, 509, 323, 506 आणि 185 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेगाव परिसरातील जैन रुग्णालयाजवळ एका मराठी अभिनेत्रीला शिवीगाळ करत तिच्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली गोरेगाव पोलिसांनी एका ३८ वर्षीय व्यक्तीस अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मद्यपान केलेल्या अवस्थेत होता. जेव्हा त्याने रुग्णालयाजवळ तिचा मार्ग अडविला आणि तेव्हा तिच्याशी त्याचा वाद सुरु झाला. त्याने तिला शिवीगाळ केली आणि तिला ढकलले. शुक्रवारी ही घटना घडली. गोरेगाव पोलिसांकडून भादंवि कलम 354, 509, 323, 506 आणि 185 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.