धक्कादायक ! चौदावं लग्न करण्यासाठी केली तेराव्या पत्नीची हत्या, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 18:16 IST2017-10-07T18:15:20+5:302017-10-07T18:16:01+5:30

पोलिसांना हत्येचा तपास करण्यास सुरुवात केली असता, आरोपी तरुणाने याआधीही अनेक लग्नं केल्याचं समोर आलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, कसून चौकशी करत आहेत.

A man kills wife to get married with another woman | धक्कादायक ! चौदावं लग्न करण्यासाठी केली तेराव्या पत्नीची हत्या, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

धक्कादायक ! चौदावं लग्न करण्यासाठी केली तेराव्या पत्नीची हत्या, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लखनऊ - तिहेरी तलाक प्रकरणानंतरही देशातील मुस्लिम महिलांच्या परिस्थितीत कोणती सुधारणा होताना दिसत नाहीये. असंच एक प्रकरण रायबरेलीच्या नसीराबाद परिसरात पहायला मिळालं आहे. जिथे एका व्यक्तीने लग्न करण्यासाठी आपल्याच पत्नीची हत्या केली. पोलिसांना हत्येचा तपास करण्यास सुरुवात केली असता, आरोपी तरुणाने याआधीही अनेक लग्नं केल्याचं समोर आलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, कसून चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अमेठीमधील एका गावातील आहे. जिया का पुरवा असं या गावाचं नाव आहे. येथील रेशमा नावाच्या तरुणीने चार वर्षांपुर्वी फुरसतगंजमधील तेंदुआ गावातील मुस्तकीम नावाच्या तरुणाशी लग्न केलं होतं. घरच्यांचा विरोध असतानाही रेशमाने मुस्तकीमशी निकाह केला होता. मुस्तकीम ट्रक ड्रायव्हर आहे, आणि तो आधीपासूनच विवाहित होता. मात्र रेशमाला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. 

मुस्तकीमने रेशमाच्या भावाला फोन करुन बहिणीची हत्या झाल्याची माहिती दिली होती. यानंतरच रेशमाच्या कुटुंबियांना मुस्तकीमबद्दल माहिती मिळाली. रेशमाचा मृतदेह नसिराबाद येथील शिवलामऊ येथे सापडला. मुस्तकीमचे अनेक तरुणी आणि महिलांसोबत संबंध असल्याचा आरोप रेशमाच्या कुटुंबियांनी केला आहे. तसंच रेशमा त्याची तेरावी पत्नी होती असा दावाही केला आहे. मुस्तकीमला रेखा नावाच्या महिलेशी लग्न करायचं होतं, त्यामुळेच त्याने रेशमाची हत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे. 

पोलिसांनी मुस्तकीमला अटक केली आहे. तसंच त्याच्यासंबंध संपुर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पोलिसांनी तपास केला असता, मुस्तकीम आधीपासूनच विवाहित असल्याची माहिती समोर आली. आपली पत्नी शाहिदाच्या मृत्यूनंतर त्याने रेशमाशी लग्न केल्याचंही उघड झाले. दरम्यान पोलीस त्याने नेमकी किती लग्न केली आहेत याचा तपास करत आहेत. 
 

Web Title: A man kills wife to get married with another woman