माझी पत्नी आत्मघातकी, विमानतळावर बॉम्बस्फोट करणार; पोलिसांना आला निनावी फोन, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 13:17 IST2019-08-17T13:16:08+5:302019-08-17T13:17:01+5:30
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने या व्यक्तीला अटक केल्यानंतर ही माहिती उघड झाली.

माझी पत्नी आत्मघातकी, विमानतळावर बॉम्बस्फोट करणार; पोलिसांना आला निनावी फोन, त्यानंतर...
नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांना एक अज्ञात व्यक्तीने फोन करुन माझी पत्नी आत्मघातकी आहे ती दिल्ली विमानतळावर बॉम्बस्फोट घडविणार आहे असा संदेश दिल्यानंतर एकच खळबळ उडाली. या फोननंतर दिल्ली पोलिसांची पळापळ झाली. मात्र अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे.
या अज्ञात व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी दिल्ली विमानतळावर बॉम्बस्फोट घडविण्यासाठी गेली आहे. पोलिसांनी संबधित घटनेची चौकशी केल्यानंतर या व्यक्तीने लोकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी असं कृत्य केल्याचं समोर आलं. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने या व्यक्तीला अटक केल्यानंतर ही माहिती उघड झाली.
Special Cell, Delhi Police: A man has been arrested from Bawana, for allegedly making a hoax call on 8th August, that his wife is a 'fidayeen' & on her way to Delhi Airport to set off a bomb, in order to stop her from leaving the country. pic.twitter.com/NHxc4UgP9H
— ANI (@ANI) August 17, 2019
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 ऑगस्ट रोजी या व्यक्तीने कंट्रोल रुमला फोन केला. या व्यक्तीने पोलिसांना आपल्या बोलण्यामध्ये गुंतवून ठेवलं होतं. यामध्ये त्याने माझी पत्नी आत्मघातकी आहे. ती दिल्ली विमानतळावर बॉम्बस्फोट घडविण्यासाठी गेली आहे असं सांगितले.
या फोननंतर दिल्ली पोलिसांनी तात्काळ विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांना अलर्ट केलं. तपास यंत्रणांनी तातडीने सूत्र हलविली. अखेर संपूर्ण चौकशी केल्यानंतर ही बातमी चुकीची असल्याचं निष्पन्न झालं. हा अज्ञात व्यक्ती खोटं बोलल्याचं कळाल्यानंतर पोलिसांनी याचा तपास केला. त्यावेळी समजलं की, त्या व्यक्तीची पत्नी परदेशात जात होती. तिला रोखण्यासाठी तिच्या नवऱ्याने हा प्रताप केला. मात्र त्याच्या या प्रतापामुळे पोलिसांची मात्र तारांबळ उडाली.