खाडी किनारी पत्र्याच्या पेटीमध्ये आढळला पुरुषाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 20:24 IST2021-05-13T20:23:29+5:302021-05-13T20:24:11+5:30

Deadbody Found : मृतदेह घटनास्थळी उपस्थित असलेल्या मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन विभागाचे प्रमुख अधिकारी संतोष कदम यांनी दिली.

The Man dead body was found in a box | खाडी किनारी पत्र्याच्या पेटीमध्ये आढळला पुरुषाचा मृतदेह

खाडी किनारी पत्र्याच्या पेटीमध्ये आढळला पुरुषाचा मृतदेह

ठळक मुद्देखाडी किना-याजवळ पडलेल्या पेटीमधून दुर्गधी येत असल्याची माहिती काही स्थानिक नागरीकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना दिली.

मुंब्रा - दिव्यातील खाडी किनारी पत्र्याच्या  पेटीमध्ये गुरुवारी संध्याकाळी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. खाडी किना-याजवळ पडलेल्या पेटीमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती काही स्थानिक नागरीकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. घटनास्थळी पोहचलेल्या जवानांनी पेटीची पहाणी केली असता आतमध्ये पुरुषाचा मृतदेह असल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. मृतदेह घटनास्थळी उपस्थित असलेल्या मुंब्रापोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन विभागाचे प्रमुख अधिकारी संतोष कदम यांनी दिली.

Web Title: The Man dead body was found in a box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.