शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
3
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
4
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
6
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
7
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
8
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
9
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
10
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
11
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
12
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
13
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
14
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
15
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
16
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
17
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
18
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
19
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
20
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान

अभिनेत्री दीपाली सय्यदला बलात्कार अन् जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 10:10 PM

Crime News : या प्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी रविवारी अहमदनगर येथून एका २८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

ठळक मुद्देत्यांनतर तिला बलात्कार करण्याची आणि अहमदनगरमध्ये आली तर जीवे ठार मारून टाकण्याची धमकी त्याने दिली.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद हिला बलात्कार करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी रविवारी अहमदनगर येथून एका २८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.संदीप वाघ असे आरोपीचे नाव आहे. गेल्या वर्षभरापासून तो सय्यद हिला त्रास देत आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये दीपाली अहमदनगरमध्ये पाण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघ याने कुणाकडून तिचा संपर्क क्रमांक मिळवला होता. त्यानंतर तो कारण नसताना कॉल आणि मेसेज करत होता. त्यावर सय्यदने त्याला ब्लॉक केले. ४ ऑक्टोबरला त्याने पुन्हा कॉल केला. वर्षभरापासून त्रास देणारा वाघ असल्याचे दीपाली यांना तेव्हा समजले नाही. मी अहमदनगरमधील पाथर्डी येथून बोलत असून वाढदिवसाच्या पार्टीला येणार का असे त्याने विचारले. त्यावर वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहण्याचे एक लाख रुपये घेत असल्याचे तिने समोरील व्यक्तीला सांगितले. त्यावर वाघ याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ केल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करेन, असे दीपालीने त्याला बजावले. 

 

त्यांनतर तिला बलात्कार करण्याची आणि अहमदनगरमध्ये आली तर जीवे ठार मारून टाकण्याची धमकी त्याने दिली. या धक्कादायक प्रकारानंतर दीपालीने तिच्या भावाशी संपर्क साधून सर्व घडलेली हकिकत सांगितली. तिने आरोपीचा क्रमांकही भावाला पाठवला. नंतर त्यानेही संपर्क साधून त्याला जाब विचारला असता त्यालाही शिवीगाळ केली. ती ड्रग पुरवते असे खोटेही त्याने तिच्याबद्दल सांगितले. अखेर दीपालीने ओशिवरा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी वाघ याला अटक करून न्यायालयात हजर केले. 

 

टॅग्स :ArrestअटकRapeबलात्कारPoliceपोलिसMumbaiमुंबईdeepali sayedदीपाली सय्यद