ठाण्यात दोन दुकाने फोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्यास अटक; नौपाडा पोलिसांची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 21:19 IST2021-12-08T21:19:08+5:302021-12-08T21:19:57+5:30
Action of Naupada Police : ठाण्यातील मखमली तलाव परिसरातील छाया सोसायटीतील लखमशीभाई रिटा यांचे ओम प्लायवूड आणि भावेश जैन यांचे मोटो गॅलेक्सी या दुकानांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करण्याचा प्रकार २७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते २८ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास झाला होता.

ठाण्यात दोन दुकाने फोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्यास अटक; नौपाडा पोलिसांची कामगिरी
ठाणे : नौपाड्यातील मखमली तलाव परिसरातील छाया सोसायटीतील प्लायवूडच्या दुकानासह दोन दुकाने फोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या मनोज केदार शाहू (२७, रा. खोपट, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यातील मखमली तलाव परिसरातील छाया सोसायटीतील लखमशीभाई रिटा यांचे ओम प्लायवूड आणि भावेश जैन यांचे मोटो गॅलेक्सी या दुकानांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करण्याचा प्रकार २७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते २८ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास झाला होता. याप्रकरणी ६ डिसेंबर रोजी मयूर पटेल यांनी चोरीच्या प्रयत्नाची तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ आणि अविनाश सोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे, पोलीस हवालदार साहेबराव पाटील, पोलीस नाईक संजय चव्हाण आणि सुनील राठोड आदींच्या पथकाने यातील संशयित आरोपी मनोज याला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अटक केली. त्याच्याकडून एक मोबाईल हस्तगत केला आहे. त्याच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.