धक्कादायक! मोठ्या भावाने टोमॅटो तोडून घेतले, छोट्या भावाने चाकूने हल्ला करत केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 16:08 IST2023-01-17T16:07:57+5:302023-01-17T16:08:36+5:30

गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे.

man allegedly killed elder brother fight over tomato gujarat | धक्कादायक! मोठ्या भावाने टोमॅटो तोडून घेतले, छोट्या भावाने चाकूने हल्ला करत केली हत्या

धक्कादायक! मोठ्या भावाने टोमॅटो तोडून घेतले, छोट्या भावाने चाकूने हल्ला करत केली हत्या

गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे. हा वाद शेतातील टोमॅटो तोडण्यावरुन सुरू झाला. यातून पुढ लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

ही घटना गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील सागबारा तहसीलमधील धवलीवर गावची आहे. मासिराम कायला वसावा असे आरोपीचे नाव असून तो शेतीकाम करायचा. तो आपला मोठा भाऊ काशीराम याच्यासोबत येथे राहत होता.

मासीराम यांच्या शेतात टोमॅटोचे पीक घेतले. काशीराम रोज शेतातून काही टोमॅटो तोडत असे. मासीरामला ही माहिती समजली. यावेळी त्याला ही गोष्ट आवडली नाही.

नितीन गडकरींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा कुख्यात गुंड; पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

रविवार, 15 जानेवारी रोजी दुपारी काशीराम टोमॅटो तोडण्यासाठी त्याच्या लहान भावाच्या शेतात पोहोचला होता. यावरून दोघांमध्ये वाद झाला. आधी वादावादी सुरू झाली, त्यानंतर काही वेळातच दोघांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान, लहान भावाने चाकू उचलून काशीराम यांच्यावर चाकूने अनेक वार केले. काशीराम यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. 

“मोठा भाऊ काशीराम हा धाकटा भाऊ मसीरामच्या शेतातून टोमॅटो तोडायचा. टोमॅटो तोडण्यावरून दोन भावांमध्ये वाद झाला. यादरम्यान मासीरामने चाकूने वार करून काशीरामची हत्या केली.

Web Title: man allegedly killed elder brother fight over tomato gujarat