गोव्यात इमारत प्रकल्पावरुन पडून महाराष्ट्रातील कामगाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 20:29 IST2019-12-25T20:27:08+5:302019-12-25T20:29:05+5:30
मडगावातील घोगळ येथे आज सकाळी आठच्यादरम्यान ही घटना घडली.

गोव्यात इमारत प्रकल्पावरुन पडून महाराष्ट्रातील कामगाराचा मृत्यू
मडगाव - गोव्यातील दक्षिण गोव्यात एका इमारत प्रकल्पावरुन खाली पडून मूळ महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील एक कामगार जागीच ठार झाला. नितीन सांवत (५0) असे मयताचे नाव असून, तो रत्नागिरी जिल्हयातील आहे. मडगावातील घोगळ येथे आज सकाळी आठच्यादरम्यान ही घटना घडली.
येथील एका इमारत प्रकल्पात चौथ्या मजल्यावर पाणी शिंपत असताना तोल जाउन खाली पडल्याने नितीन हा गंभीर जखमी झाला व मरण पावला. अनैसर्गिक मृत्यू म्हणून फातोर्डा पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. मृतदेह मडगावच्या मोतीडोंगर येथील क्षयरुग्ण इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परेश रामनाथकर पुढील तपास करीत आहेत.