धक्कादायक! लिव्ह इन पार्टनरनं प्रेयसीची हत्या करुन मृतदेह भिंतीत गाडला, पालघरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 09:23 AM2021-02-07T09:23:41+5:302021-02-07T09:27:07+5:30

Palghar Crime : पालघरच्या वृंदावन दर्शन कॉम्पेल्समध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

maharashtra man allegedly killed her live in partner and buried her in bathrooms wall | धक्कादायक! लिव्ह इन पार्टनरनं प्रेयसीची हत्या करुन मृतदेह भिंतीत गाडला, पालघरमधील घटना

धक्कादायक! लिव्ह इन पार्टनरनं प्रेयसीची हत्या करुन मृतदेह भिंतीत गाडला, पालघरमधील घटना

Next

पालघरच्या वृंदावन दर्शन कॉम्पेल्समध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीनं आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करुन तिचा मृतदेह फ्लॅटमध्येच भिंतीत गाडला. या घटनेनं संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (man allegedly killed her live in partner and buried her in bathrooms wall )

वृंदावन दर्शन कॉम्प्लेक्सच्या फ्लॅट क्रमांक १०१ मध्ये सूरज हरमळकर आणि त्याची लिव्ह इन पार्टनर अमिता मोहिते राहत होते. जवळपास राहणाऱ्या रहिवाशांना बरेच दिवस सूरज दिसत नव्हता. तर अमिताचाही काही मागमूस लागत नव्हता. रहिवाशांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस जेव्हा सूरजच्या फ्लॅटमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना फॉरेन्सिक एक्सपर्ट, रुग्णवाहिका यांच्यासह काही कामगारांनाही बोलवावं लागलं. 
समोर आलेल्या माहितीनुसार, फ्लॅटच्या बाथरुममधील भिंतीत एक मृतदेह पुरण्यात आला होता. मृतदेह ३२ वर्षीय अमिताचा असल्याचंही निष्पन्न झालं आहे. सूरज आणि अमिता या फ्लॅटमध्ये भाडेतत्वावर राहत होते. 

बाथरुमच्या भिंतीत अमिताचा मृतदेह बऱ्याच दिवसांपासून लपविण्यात आला होता. अमिताचा मृत्यू होऊन तब्बल चार महिने झाल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी जेव्हा मृतदेह बाहेर काढला तेव्हा तो कुजलेल्या अवस्थेत होता. सूरज याला पोलिसांनी अटक केली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. 
 

Web Title: maharashtra man allegedly killed her live in partner and buried her in bathrooms wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.