संतापजनक! १९९९ रूपयांत 'महाकुंभ'मधील मुलींचे कपडे बदलतानाचे फोटो विक्रीला; FIR दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 13:12 IST2025-02-21T13:12:11+5:302025-02-21T13:12:47+5:30
धक्कादायक म्हणजे हे व्हिडिओ, फोटो टेलीग्रामवर विकले जात आहेत. मेटा प्लॅटफॉर्मवरही काही व्हिडिओ फोटो शेअर केलेत.

संतापजनक! १९९९ रूपयांत 'महाकुंभ'मधील मुलींचे कपडे बदलतानाचे फोटो विक्रीला; FIR दाखल
प्रयागराज - महाकुंभ मेळ्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक प्रयागराज इथं पोहचले. त्यात महिलाही अधिक होत्या. पवित्र गंगा स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी त्रिवेणी संगमावर झाल्याचं पाहायला मिळत होते. मात्र याच ठिकाणी महिलांचे कपडे बदलणारे आणि आंघोळीचे फोटो सोशल मीडियावर विक्री केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याचं गांभीर्य लक्षात घेऊन महाकुंभ परिसरातील कोतवाली पोलिसांनी १५ सोशल मिडिया चॅनेलविरोधात FIR दाखल केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
माहितीनुसार, कुंभ परिसरात महिलांचे स्नान केल्यानंतर कपडे बदलतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियाच्या टेलीग्रामवर १९९९ रुपयांना विकले जात आहेत. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी स्वत: पुढाकार घेत घटनेची एफआयआर दाखल केली आहे. प्रयागराज येथे गंगा स्नानासाठी आलेल्या महिला, मुलींचे खासगी व्हिडिओ, फोटो बनवून ते व्हायरल केले जात आहेत. हे व्हिडिओ आणि फोटो जेव्हा महिला त्रिवेणी संगमावर स्नान करत होत्या, त्यानंतर कपडे बदलण्यासाठी गेल्यानंतर रेकॉर्ड केले गेले. धक्कादायक म्हणजे हे व्हिडिओ, फोटो टेलीग्रामवर विकले जात आहेत. मेटा प्लॅटफॉर्मवरही काही व्हिडिओ फोटो शेअर केलेत.
या प्रकरणाबाबत पोलिसांनी २ वेगवेगळे एफआयआर केलेत. इन्स्टाग्रामवरील neha1224872024 आणि सीसीटीव्ही चॅनेल ११ कडून महाकुंभसाठी आलेल्या महिलांचे स्नान करतानाचे व्हिडिओ, फोटो विविध किंमतीत उपलब्ध करून देण्याचा दावा करण्यात येत आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी संबंधित युजर्सची मेटाकडून माहिती मागवली आहे. ज्या १५ अकाऊंटविरोधात पोलिसांनी FIR दाखल केलेत. त्यात Girls Live Video (Facebook), Desi Bhabi Ji (Facebook), Rupola Rose (Facebook), Dwivedi rasiya @dwivedirasiya4271 (Youtube), Crush of Indian @CrushofIndians (Youtube), Mahakumbh-2025 @pkumar334 (Youtube), BABA KA VLOGEE Comedy @BABAKAVLOGEE440 (Youtube), Blogger Aabha Devi @BloggerAabhaDevi077k (Youtube), Roshan Desi Vlogs @roshandesivlogs4438 (Youtube), Kapil Tv @Kapiltv1 (Youtube), Mela Mahotsav @Mela-Mahotsav (Youtube), Pushpa village vlog @pushpavillagvlog (Youtube), Hindu Official 1.2M @hinduk7066 (Youtube), Play Tube @PlayTube7325 (Youtube), desi.rasiya.video @desi.rasiya.video (Instagram) या युजर्सचा समावेश आहे.
दरम्यान, सोशल मीडिया मॉनिटरिंगवेळी महाकुंभमध्ये आलेल्या महिलांचे खासगी फोटो व्हायरल होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. काही आक्षेपार्ह फोटो कंन्टेट म्हणून विकले जात आहेत. एका पोस्टमध्ये Cctv channel 11 नावाच्या टेलीग्राम पोस्टचा स्क्रिनशॉट्स लावला आहे ज्यात महिलांचे स्नान करतानाचे व्हिडिओ १९९९ रूपयात मेंबरशिप घेतल्यानंतर दिले जातील असं लिहिलेले आहे. पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.