शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चालकाने केला बलात्कार; जंगलात नेऊन केलं घाणेरडं कृत्य

By पूनम अपराज | Updated: November 20, 2020 18:18 IST2020-11-20T18:17:22+5:302020-11-20T18:18:11+5:30

Rape : पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

Magic driver rapes minor girl going to school; Dirty act done in the forest | शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चालकाने केला बलात्कार; जंगलात नेऊन केलं घाणेरडं कृत्य

शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चालकाने केला बलात्कार; जंगलात नेऊन केलं घाणेरडं कृत्य

ठळक मुद्देआरोपी रामजनम यादव याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरूद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी सोनभद्र जिल्ह्यातील बिजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेड्यातील ९ वीच्या विद्यार्थिनीवर मॅजिक बस वाहन चालकाने बलात्कार केला. पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनीबलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. क्षेत्राधिकारी दुद्धी यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

 
नेहमीप्रमाणे विजापूर पोलीस ठाणे परिसरातील खेड्यातील इयत्ता नववीची विद्यार्थिनी मंगळवारी इतर मुलांसमवेत मॅजिक बस वाहनातून शाळेत जात होती. असा आरोप केला जातो की, इतर मुले खाली उतरल्यानंतर मॅजिक बसचालकाने मुलीला जंगलाच्या बाजूला असलेल्या निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.


यानंतर त्याने मुलीला आपल्या घरी सोडले. विद्यार्थिनीने ही माहिती बुधवारी दुसर्‍या दिवशी आईला दिली. कुटुंबाने 1090 क्रमांकावर घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी पीडित मुलीची चौकशी केली आणि गुन्हा दाखल केला आणि मॅजिक बसचालकाला अटक केली. प्रभारी निरीक्षक श्याम बहादुर यादव म्हणाले की, आरोपी रामजनम यादव याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरूद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास अधिकारी दुद्धी राम आशिष यादव करीत आहेत.

Web Title: Magic driver rapes minor girl going to school; Dirty act done in the forest