शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
4
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
5
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
6
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
7
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
8
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
9
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
10
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
11
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
12
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
13
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
14
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
15
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
16
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
17
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
18
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
19
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
20
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  

Primary teachers five crore property: बाबो! २३ वर्षांच्या नोकरीत ३६ लाख पगार; अन् छापेमारीत प्राथमिक शिक्षकाची ५ कोटींची संपत्ती उघड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 15:09 IST

Primary teachers five crore property: ११ तासांच्या चौकशीनंतर आयुक्तांनी सदर घटनेतील दोषी शिक्षक, त्याची पत्नी आणि वडिलांवर भ्रष्टाचार अधिनियम या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

प्राथमिक शिक्षकाकडे कोट्यावधींची संपत्ती मिळाली असून ही या माणसाची मालमत्ता वाचून  तुम्हीसुद्धा गोंधळात पडाल. एका प्राथमिक शाळेच्या शिक्षकाला संपूर्ण  पगार मिळून ३६ लाख रूपये सरकारकडून मिळाले. पण आयुक्तांच्या छापेमारीत या व्यक्तीकडे ५ कोटी रूपयांची संपत्ती आढळल्याचं समोर आलं आहे. ११ तासांच्या चौकशीनंतर आयुक्तांनी सदर घटनेतील दोषी शिक्षक, त्याची पत्नी आणि वडिलांवर भ्रष्टाचार अधिनियम या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

बैतूलच्या बगडोनामधील एका आलिशान घरात राहणारे पंकज श्रीवास्तव रेंगाढाना गावातील एका सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत.  त्यांची नियुक्ती १९८८ मध्ये या शाळेत झाली होती. पंकज श्रीवास्तव यांच्याविरुद्द तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांनी पगारापेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याचं दिसून आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सरकारी नोकरीशिवाय हा माणूस सावकारीचं काम सुद्धा  करतो. ज्यामुळे जे लोक कर्ज फेडू शकत नाही त्यांची संपत्ती बळकावण्याचं काम हा माणूस करायचा.

तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीची तपासणी केली. पुढे, ही बाब खरी ठरल्यानंतर मंगळवारी सकाळी पोलिसांच्या पथकाने शिक्षकांच्या घरावर छापा टाकला. छापा टाकताना शिक्षकाच्या घरातून २५ मालमत्तांची कागदपत्रे सापडली. याशिवाय एक लाख रुपयांची रोकड व बँक खाती असलेले लॉकर याबाबतही माहिती मिळाली आहे. 

पाच कोटींची संपत्ती

शिक्षकाच्या घरातून मिळालेल्या कागदपत्रांवरून या मालमत्तेचे मूल्य पाच कोटी इतके आहे. शिक्षक पंकज श्रीवास्तव, त्याचे वडील रामजन्म श्रीवास्तव यांच्यासह पत्नीवर भ्रष्टाचार कायद्याच्या विविध कलमांखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आयुक्तांच्या म्हणण्यानुसार या तिघांना जामिनावर सोडण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी सुरू केली गेली आहे. नशिब पालटलं ना राव! 'लग्न लावून द्या' म्हणणाऱ्या आझीमसमोर लागलीये मुलींची रांग; म्हणे अशीच नवरी हवी.....

भोपाळमध्ये मिनल रेसिडेन्सी, समधारात भूखंड, पिपलियामध्ये एक एकर जमीन, छिंदवाड्यात 06 एकर जमीन, बैतूल येथे 08 निवासी भूखंड, बागडोना येथील १० वेगवेगळ्या खेड्यांमध्ये 06 दुकानं आणि शेती आहे. एकूण मूल्य सुमारे 05 कोटींची मालमत्ता असल्याचे समोर येत आहे. या शिक्षकाच्या बेकायदेशीर कमाईचा अंदाज यातून  लावता येतो. त्याने गावातही एक आलिशान घर बांधले होते. यासह, भोपाळमध्ये डुपलेक्स आहे. व्हीव्हीआयपी लोकांची त्या सोसायटीत घरे आणि फ्लॅट असतात. पोलिसां या प्रकारणाचा खोलवर तपास करत आहेत. संतापजनक! जाडी अन् सावळी असल्याचं कारण देत पत्नीला सोडलं; गर्लफ्रेंडशी तुलना करत म्हणायचा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJara hatkeजरा हटकेPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश