पत्नीचे दीराशी प्रेम संबंध; अडसर ठरणाऱ्या पतीचे शीर धडापासून वेगळे केले, दीड वर्षानंतर झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 16:31 IST2022-10-30T16:25:39+5:302022-10-30T16:31:31+5:30
Madhya Pradesh Crime: पतीचा मृतदेह दीड वर्षे घरातच ठेवला. या गुन्ह्यात दीरासह सासऱ्याने मदत केली.

पत्नीचे दीराशी प्रेम संबंध; अडसर ठरणाऱ्या पतीचे शीर धडापासून वेगळे केले, दीड वर्षानंतर झाला खुलासा
Madhya Pradesh Crime: प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीची हत्या केल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. पण, मध्य प्रदेशात घडलेल्या या घटनेने तुमचाही थरकाप उडेल. दीरासोबत असलेल्या प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने अतिशय क्रुर पद्धतीने काटा काढला. विशेष म्हणजे या गुन्ह्यात महिलेला दीर आणि सासऱ्याने मदत केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील उमरी गावात ही थरकाप उडवणारी घटना घडली. पोलिसांनी सांगितल्यानुसार, महिलेने दीर आणि काका सासऱ्याच्या मदतीने पतीला विष देऊन ठार केले आणि नंतर पतीचे शीर धडापासून वेगळे केले. यानंतर दीड वर्षे पतीचा मृतदेह घरातच भुश्याच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवला. दीड वर्षानंतर पतीचा सांगाडा जंगलात फेकून दिला. इथेच महिलेचा गुन्हा उघडकीस आला.
नेमकं काय घडलं?
जंगलात सांगाडा सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि पतीच्या हत्येप्रकरणी महिलेसह 4 आरोपींना ताब्यात घेतले. सध्या दोन आरोपींचा शोध सुरू आहे. 40 वर्षीय रामसुशील पाल यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता. यानंतर त्यांनी बिटोल उर्फ रंजना पाल नावाच्या महिलेसोबत दुसरे लग्न केले. लग्नाच्या दोन वर्षानंतर रंजनाचे दीर गुलाब पालसोबत प्रेमसुख जुळले.
याची माहिती लागताच रामसुशील आणि रंजना, यांच्यात भांडणे सुरू झाली. यानंतर रंजना आणि गुलाबने रामसुशीलची हत्या करण्याची योजना आखली. रामसुशीलची हत्या केल्यानंतर, त्याची संपत्ती हडपण्याची योजना होती. यात रामसुशीलची पत्नी रंजना आणि भाऊ गुलाबने, दुसरा भाऊ अंजनी पाल आणि काका रामपती पालसह, इतर दोघांना सामील केले. अखेर दीड वर्षानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.