नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; AC न मिळाल्याने पत्नीला दिला ट्रिपल तलाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 09:08 IST2025-06-04T09:07:19+5:302025-06-04T09:08:15+5:30

सासरचे लोक हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचा आरोप महिलेने केला.

lucknow husband gave triple talaq to wife not get ac in dowry married one and half year ago | नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; AC न मिळाल्याने पत्नीला दिला ट्रिपल तलाक

नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; AC न मिळाल्याने पत्नीला दिला ट्रिपल तलाक

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील काकोरी भागात एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध ट्रिपल तलाक आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. लग्न झाल्यानंतर तिचे सासरचे लोक हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचा आरोप महिलेने केला. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, हुंड्यात एसी आणि कार मागितली जात होती आणि जेव्हा दिली नाही तेव्हा तिला जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

काकोरी येथील रहिवासी असलेल्या महिलेचं लग्न दोन वर्षांपूर्वी हरदोईतील संदिला येथील रहिवासी वसी अहमदशी झालं होतं. लग्नानंतर काही दिवसांतच तिचा पती आणि सासरच्या इतर लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तिच्या सहा महिन्यांच्या मुलीवरही अत्याचार करण्यात आला.

२७ मे रोजी हुंड्यासाठी महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आणि तिला जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेनंतर महिलेने तात्काळ पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला. मात्र आरोपी पतीने त्यावेळी माफी मागितली.

दुसऱ्याच दिवशी म्हणजे २८ मे रोजी, कुटुंबातील सदस्यांसमोरच महिलेवर अत्याचार करण्यात आला आणि पतीने ट्रिपल तलाक देऊन तिला घराबाहेर हाकलून लावले. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पुराव्याच्या आधारे आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही म्हणाले.
 

Web Title: lucknow husband gave triple talaq to wife not get ac in dowry married one and half year ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.