गर्लफ्रेंडच्या पतीला पाहून बॉयफ्रेंडची उडाली तारांबळ; चक्क पाचव्या मजल्यावरून घेतली उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 22:00 IST2021-12-15T21:59:30+5:302021-12-15T22:00:02+5:30
Lover Mohsin jumped from 5th floor : नैनितालमध्ये राहणाऱ्या २४ वर्षांच्या तरुणीचं लग्न झालं होतं. मात्र, तरीही तिचं मोहसिन उर्फ आजमसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. दोघांनी घरातून पळून जाऊन दुसऱ्या शहरात एकत्र राहण्याचे ठरवले.

गर्लफ्रेंडच्या पतीला पाहून बॉयफ्रेंडची उडाली तारांबळ; चक्क पाचव्या मजल्यावरून घेतली उडी
जयपूर - गर्लफ्रेंडचा पती अचानक घरी आल्याचे पाहून घाबरलेल्या बॉयफ्रेंडने पाचव्या मजल्यावरून खाली उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. गेल्या दोन वर्षांपासून हे कपल एकमेकांसोबत राहत होतं. लग्न झालेल्या प्रेयसीला तिच्या प्रियकराने पळवून आणलं होतं आणि एका भाड्याच्या खोलीत दोघं राहत होते. मात्र पत्नीचा शोध घेऊन पती तिथं पोहोचला आणि प्रियकर सैरावर झाला.
नैनितालमध्ये राहणाऱ्या २४ वर्षांच्या तरुणीचं लग्न झालं होतं. मात्र, तरीही तिचं मोहसिन उर्फ आजमसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. दोघांनी घरातून पळून जाऊन दुसऱ्या शहरात एकत्र राहण्याचे ठरवले. त्यानुसार एक दिवस दोघंही आपापल्या घरातून बाहेर पडले आणि जयपूरला आले. जयपूरमध्ये एका इमारतीत फ्लॅट भाड्यानं घेत दोघं तिथं राहू लागले. इथे राहणाऱ्या इतर लोकांना हे दोघं पती-पत्नी असल्याचं वाटत होतं. नैनितालपासून इतक्या दूरवर आणि तेही वेगळ्या राज्यात आपल्याला शोधायला कुणी येणार नाही, असं त्या जोडप्याला वाटत होते. मात्र विवाहित तरुणीच्या पतीनं आपल्या पत्नीचा शोध घेतला.
आपली पत्नी जयपूरमध्ये एका मित्रासोबत राहत असल्याची माहिती पतीला समजल्यानंतर खरं काय ते जाणून घेण्यासाठी त्याने तिचं घर शोधून तिला भेटायचं ठरवले. तिचा पत्ता मिळवून तो पत्नीच्या घरी पोहोचला. यावेळी त्याची पत्नी आणि मोहसीन दोघंही घरात होते. डोअर बेल वाजल्यानंतर पत्नीनं दार उघडलं आणि आपल्या पतीला समोर पाहून तिला जबरदस्त धक्काच बसला. नंतर तिच्यापेक्षाही मोहसीनला याचा मोठा धक्का बसला. आपल्या गर्लफ्रेंडच्या पतीला पाहून तो इतका घाबरला की त्याने पाचव्या मजल्यावरून थेट खाली उडी मारली.
या घटनेनंतर महिलेच्या पतीने तात्काळ तिथून पळ काढला. दुसरीकडे महिला मोहसीनला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचं समजल्यावर ती देखील घाबरली आणि तिनेही तिथून काढता पाय घेतला. सध्या पती आणि पत्नी फरार आहेत. पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत.