शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी प्रियकराने २ नर्ससोबत केला सौदा, तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 21:47 IST

Lover deals with 2 nurses to abort girlfriend : अवैध संबंधांमुळे प्रेयसीला गरोदर केले आणि प्रियकराने ३० हजार रुपयांमध्ये गर्भपात करण्यासाठी सौदा केला. प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी तो नर्सच्या घरी पोहोचला.

हनुमानगड - राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यात एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे अवैध संबंधांमुळे प्रेयसीला गरोदर केले आणि प्रियकराने ३० हजार रुपयांमध्ये गर्भपात करण्यासाठी सौदा केला. प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी तो नर्सच्या घरी पोहोचला. गर्भपात करताना जास्त रक्तस्त्राव झाल्याने प्रियकर घाबरला आणि त्याने प्रेयसीसह खासगी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, तिथेच तिचा मृत्यू झाला. बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या परिचारिका आणि प्रियकराला पोलिसांनीअटक केली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपास करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, हनुमानगड जिल्ह्यातील संगरिया येथील शाहपिनी गावात राहणारा अंकित कुमार (२२) याचे एका १८ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. नुकतीच मुलगी गरोदर राहिली. ही बाब लक्षात येताच अंकितने तिचा बेकायदेशीर गर्भपात करण्याचा कट रचला. यासाठी त्यांनी हनुमानगढ शहरात राहणाऱ्या ममता या नर्सशी संपर्क साधला. दोघांमध्ये ३० हजार रुपयांमध्ये गर्भपात करून घेण्याचा सौदा ठरला.८ डिसेंबरला गर्भपात झालात्यानंतर ८ डिसेंबरला अंकित त्याच्या गरोदर मैत्रिणीसोबत ममताच्या घरी पोहोचला. तिथे ममताने तिची सहकारी परिचारिका कविताला बोलावून गर्भपात करण्यात मदत केली. ममता हनुमानगड शहरातील वॉर्ड क्रमांक ४६ मध्ये भाड्याच्या घरात राहते. तेथे दोघांनी मिळून मुलीचा गर्भपात केला. मात्र यादरम्यान मुलीला जास्त रक्तस्त्राव झाल्याने अंकित घाबरला.मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच दोन्ही परिचारिका फरार झाल्यात्याने तिला हनुमानगनाड शहरातील एका खाजगी रुग्णालयात नेले आणि तेथे तिला दाखल केले. मात्र तेथे उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच दोन्ही परिचारिकांनी तेथून पळ काढला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता अंकितने ती मुलगी रस्त्यावर पडलेली दिसली आणि उपचारासाठी आणल्याचा बतावणी केली. 

नर्स आणि प्रियकर अंकित या दोघांना अटकदुसरीकडे, दुसऱ्या दिवशी ९ डिसेंबर रोजी मृत मुलीच्या वडिलांनी अंकितविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यामुळे पोलिसांनाही त्याच्यावर संशय आला. तपासाअंती पोलिसांनी सोमवारी अंकितला पकडले आणि त्याची कसून चौकशी केली, त्यानंतर त्याने संपूर्ण सत्याचा पर्दाफाश केला. त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या ममता आणि कविता या दोन्ही परिचारिकांनाही नगर पोलिसांनी अटक केली आहे.ममता आणि कविता यांनी अनेक अवैध गर्भपात केले आहेतशहर पोलीस दोन्ही परिचारिकांची चौकशी करण्यात व्यस्त आहेत. त्यांनी आतापर्यंत आणखी किती बेकायदेशीर गर्भपात केले आहेत, याचा शोध घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. या टोळीतील इतर कोण आहेत? प्राथमिक तपासाअंती ममता आणि कविता यांनी मिळून भाड्याच्या घरात राहून इतर अनेक तरुणी व महिलांचे अवैध गर्भपात केल्याचे समोर आले आहे. पोलीस त्याच्या तपासात गुंतले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिसAbortionगर्भपातArrestअटक