प्रियकर अन् प्रेयसीला कुऱ्हाडीने सपासप कापले; असहाय्य आई बाप खिडकीतून राहिले पाहत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 04:32 PM2021-05-15T16:32:28+5:302021-05-15T16:33:50+5:30

Father kills daughter and her lover with axe : सपना आणि कल्लूच्या प्रेमसंबंधांची माहिती दोन्ही कुटुंबांसह गावात चर्चेचा विषय बनली होती. ज्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये अनेक वाद-विवाद झाले होते.

The lover and the beloved were cut to pieces with an axe; Helpless parents looking out the window | प्रियकर अन् प्रेयसीला कुऱ्हाडीने सपासप कापले; असहाय्य आई बाप खिडकीतून राहिले पाहत

प्रियकर अन् प्रेयसीला कुऱ्हाडीने सपासप कापले; असहाय्य आई बाप खिडकीतून राहिले पाहत

Next
ठळक मुद्देघटनास्थळाची पाहणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

कानपूर - कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडिलांनी आपल्या भावांसोबत मिळून अल्पवयीन मुलीसह तिच्या प्रियकराला कुऱ्हाडीने घाव घालून ठार केले. अल्पवयीन मुलगी आणि तिच्या प्रियकराच्या हत्येनंतर आरोपी मृतदेहांजवळ बसला आणि पोलीस येण्यापूर्वीच आरोपीचा भाऊ फरार झाला. या घटनेनंतर संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

शिव आसरे हा घाटमपूर कोतवाली परिसरातील बिरहिणपूर गावात राहणारा ट्रक चालक आहे. कुटुंबात एक पत्नी आणि चार मुलं होती, ज्यात सपना (१६) नावाची मोठी मुलगी होती. सपनाचे शेजारी राहणारे बैजनाथचा मुलगा कल्लू (१७) याच्याशी प्रेमसंबंध होते. सपना आणि कल्लू एकत्र शाळेत असताना त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरु झाले. सपना आणि कल्लूच्या प्रेमसंबंधांची माहिती दोन्ही कुटुंबांसह गावात चर्चेचा विषय बनली होती. ज्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये अनेक वाद-विवाद झाले होते.


मुलीचे वडील लग्नाच्या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी गेले होते

गेल्या गुरुवारी भावाच्या लग्नाला शिवआसरे आपली पत्नी व दोन मुलांसह बांदा येथील बरुआ गावी गेले होते. सपना लहान भावासोबत घरी एकटी होती. शुक्रवारी उशिरा रात्री १ वाजण्याच्या सुमारास कल्लू सपनाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. याची माहिती सपनाच्या काकांना मिळाला. काकांनी मुख्य दरवाजाला कुलूप लावून शिवआसरे यांना याबाबत माहिती दिली .

त्याच दिवशी शिवआसरे म्हणजेच मुलीचे वडील शिवा बांदा येथून भाटमपूरला रवाना झाले. शनिवारी सकाळी शिवआसरे घरी पोचले. आरोपीने आपल्या भाऊ अमसरे व दीपक यांच्यासह मुलगी व तिच्या प्रियकराची कुऱ्हाडीने हत्या केली.

कल्लूचे कुटुंब खिडकीतून पाहत राहिले

कल्लू हा कुटूंबातील एकुलता एक मुलगा होता. शिवआसरे हे आपल्या भावांसोबत ही क्रूर घटना घडवून आणत होते. प्रियकराचे आईवडील खिडकीतून असहाय्य होऊन पाहत होते आणि मुलाच्या जीवाची भीक मागत होते. घराला कुलूप असल्याने ते आत जाऊ शकले नाहीत. दोघेही डोळ्यासमोर मारले गेले. घाटमपूर कोतवाल धनेश प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टसाठी पाठवले जात आहेत. गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासह फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: The lover and the beloved were cut to pieces with an axe; Helpless parents looking out the window

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app