"काय कराल जाणून?" हत्येनंतर अघोरी कृत्य आणि चेहऱ्यावर विकृत हास्य; इंदूरच्या 'त्या' हैवानाने पोलिसांनाही रडवले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:33 IST2026-02-18T13:28:00+5:302026-02-18T13:33:00+5:30

इंदौरमधील एमबीएच्या विद्यार्थिनीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे.

Love Murder and Black Magic Chilling Details of Indore MBA Student Slaying That Left Even Cops in Tears | "काय कराल जाणून?" हत्येनंतर अघोरी कृत्य आणि चेहऱ्यावर विकृत हास्य; इंदूरच्या 'त्या' हैवानाने पोलिसांनाही रडवले!

"काय कराल जाणून?" हत्येनंतर अघोरी कृत्य आणि चेहऱ्यावर विकृत हास्य; इंदूरच्या 'त्या' हैवानाने पोलिसांनाही रडवले!

Indore Crime: मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये एका एमबीएच्या विद्यार्थिनीची झालेली निर्घृण  हत्या सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली आहे. या प्रकरणातील आरोपी पीयूष धामनोतिया याने फक्त त्याच्या प्रेयसीचा जीवच घेतला नाही, तर तिच्या मृतदेहाची विटंबना करून अघोरी कृत्येही केली. पोलीस तपासात समोर आलेले खुलासे ऐकून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याही डोळ्यांत पाणी आले. अटकेनंतरही आरोपी पीयूषला केलेल्या कृत्याचा पश्चाताप नव्हता.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

गिफ्ट देण्याच्या बहाण्याने रचला मृत्यूचा सापळा

१० फेब्रुवारी रोजी पीडित विद्यार्थिनी आपल्या वडिलांसोबत घरातून निघाली होती. पीयूषने तिला काही प्रकरणांवर चर्चा करण्यासाठी आणि सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी आपल्या भाड्याच्या खोलीवर बोलावले. पीयूषने तिचे हात-पाय बांधले आणि डोळ्यांवर पट्टी बांधली. तिला वाटले की तो काहीतरी भेट देणार आहे, पण त्याच वेळी त्याने तिच्या तोंडात पॉलिथिन कोंबून गळा आवळून तिची हत्या केली.

मृतदेहासोबत मद्यपान आणि अघोरी कृत्य

हत्येनंतर पीयूष इथेच थांबली नाही. आरोपीने विद्यार्थिनीच्या मृतदेहावर चाकूने वार केले. त्यानंतर त्याने मृतदेहाशेजारी बसून मद्यपान केले. हत्येनंतर तो आधी गोव्याला आणि नंतर पनवेलला पळून आला. तिथे त्याने हॉटेलमध्ये बसून युट्यूबवर आत्मांशी कसं बोलायचं? हे सर्च केले आणि मृताच्या आत्म्याला बोलावण्यासाठी तांत्रिक विधी करण्याचा प्रयत्न केला.

पीयूषने हत्येनंतर विद्यार्थिनीचा मोबाईल स्वतःकडे ठेवला होता. त्याने तिच्या मोबाईलमधील ११ आक्षेपार्ह व्हिडिओ कॉलेजच्या ग्रुपवर आणि तिच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर शेअर केले. पीडितेचे चारित्र्यहनन करून स्वतःचा गुन्हा लपवण्याचा हा त्याचा विकृत प्रयत्न होता. इतकेच नाही तर त्याने तिच्या बहिणीला मेसेज केला की, "बाबांना सांगा ती आता कधीच घरी परतणार नाही."

बहिणीचा खळबळजनक खुलासा

पीडितेच्या लहान बहिणीने पीयूषबद्दल धक्कादायक माहिती दिली. पीयूष पीडितेचे डिजिटल वॉलेट स्वतः चालवायचा आणि तिचे पैसे खर्च करायचा. एका महिन्यापूर्वी त्याने संशयावरून तिचा मोबाईल फोडला होता आणि तो दुरुस्त करण्याचे पैसेही पीडितेच्या बहिणीकडूनच घेतले होते. तो सतत तिच्यावर संशय घ्यायचा. ज्या ॲपवरून वाद व्हायचा, ते ॲप खरंतर तिची लहान बहीण आपल्या मैत्रिणींशी बोलण्यासाठी वापरत होती.

काय कराल जाणून? आरोपीचा निर्लज्जपणा

पोलिसांनी पीयूषला गोवा-महाराष्ट्र सीमेवर चालत्या ट्रेनमधून अटक केली. जेव्हा त्याला न्यायालयात नेण्यात आले, तेव्हा पत्रकारांनी विचारले की, तू तिची हत्या का केलीस? त्यावर तो हसत म्हणाला, जे झालं ते झालं. सोडून टाका, काय कराल जाणून? वेळ येईल तेव्हा सगळं सांगेन." त्याच्या चेहऱ्यावर जराही पश्चात्ताप नव्हता. आरोपी पीयूष धामनोतियाची पोलीस कोठडी आज संपत असून, त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस या प्रकरणातील तांत्रिक पुरावे आणि जप्त केलेले साहित्य यांच्या आधारे खटला मजबूत करत आहेत.

Web Title : इंदौर: एमबीए छात्रा की हत्या, आरोपी के घिनौने कृत्य से पुलिस भी हैरान।

Web Summary : इंदौर में एक एमबीए छात्रा की हत्या: आरोपी पीयूष ने प्रेमिका की हत्या की, शव को विरूपित किया और अघोरी कृत्य किए। उसने पत्रकारों का उपहास किया। पुलिस जांच में अपराध और उसे छिपाने के प्रयासों का खुलासा हुआ।

Web Title : Indore MBA student murder: Accused's heinous acts shock police, show no remorse.

Web Summary : Indore student murder: Accused Piyush killed his girlfriend, desecrated her body, and performed occult practices. He showed no remorse, even mocking journalists. Police investigation revealed disturbing details of the crime and his attempts to cover it up.