लव्ह मॅरेज, घटस्फोट अन् नैराश्याचा विळखा; तरुण मातेने मुलासह घेतला गळफास, आत्महत्येपूर्वी मोबाईलही तोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 15:04 IST2026-02-14T15:03:40+5:302026-02-14T15:04:01+5:30

प्रेमापोटी बांधलेली लग्नाची गाठ सुटली की आयुष्य किती उद्ध्वस्त होऊ शकतं, याचा एक सुन्न करणारा प्रकार सूरतच्या उमरा परिसरातून समोर आला आहे.

Love marriage, divorce and depression; Young mother hangs herself with her son, also breaks her mobile phone before committing suicide | लव्ह मॅरेज, घटस्फोट अन् नैराश्याचा विळखा; तरुण मातेने मुलासह घेतला गळफास, आत्महत्येपूर्वी मोबाईलही तोडला

लव्ह मॅरेज, घटस्फोट अन् नैराश्याचा विळखा; तरुण मातेने मुलासह घेतला गळफास, आत्महत्येपूर्वी मोबाईलही तोडला

प्रेमापोटी बांधलेली लग्नाची गाठ सुटली की आयुष्य किती उद्ध्वस्त होऊ शकतं, याचा एक सुन्न करणारा प्रकार सूरतच्या उमरा परिसरातून समोर आला आहे. एका २६ वर्षीय महिलेने आपल्या अवघ्या ४ वर्षांच्या निष्पाप मुलाला फासावर लटकवून त्याची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पूनम शाह असे या मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय आहे नेमकी घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, पूनम शाह ही घटस्फोटित होती. पतीपासून वेगळे झाल्यानंतर ती आपला ४ वर्षांचा मुलगा 'शिजाय' याच्यासह माहेरी आई आणि भावाकडे राहत होती. शुक्रवारी सकाळी पूनमचा भाऊ सोपान तायडे कामासाठी बाहेर गेला होता. सकाळी ११ च्या सुमारास तो मोबाईल चार्जर घेण्यासाठी अचानक घरी परतला. घराचा दरवाजा उघडताच समोरचे दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याची बहीण पूनम आणि भाचा शिवाय या दोघांचेही मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होते.

रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

घाबरलेल्या सोपानने तातडीने दोघांनाही खाली उतरवले आणि जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. तिथून त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केले. पूनमने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी आपला मोबाईल फोनही तोडून टाकला होता, जेणेकरून तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी समोर येऊ नयेत.

प्रेमविवाहाचा असा झाला कडवट शेवट

पूनमने पाच वर्षांपूर्वी अहमदाबादच्या करण शाह याच्याशी प्रेमविवाह केला होता. मात्र, लग्नानंतर काही काळातच त्यांच्यात वाद सुरू झाले. पूनमच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, करण तिला वारंवार मानसिक त्रास द्यायचा आणि तिला माहेरी पाठवून द्यायचा. या त्रासाला कंटाळून अखेर त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटापासून पूनम प्रचंड नैराश्यात होती. ती कोणाशीही जास्त बोलत नसे आणि सतत उदास असायची. याच मानसिक दबावातून तिने हे भयंकर पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.

पोलिसांकडून सखोल तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच उमरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पूनमच्या नणंदेने आणि पतीने तिला दिलेल्या त्रासामुळेच ही वेळ आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. "ती घरात कुणाशी बोलत नव्हती, पण तिच्या मनात इतकी मोठी खदखद असेल असे वाटले नव्हते," अशा शब्दांत तिच्या भावाने आपल्या भावना व्यक्त केल्या.

पोलीस आता कौटुंबिक छळ आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या कोनातून या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका हसत्याखेळत्या लेकराचा आणि तरुण मातेचा असा अंत झाल्याने उमरा परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title : प्रेम विवाह, तलाक, अवसाद: युवा माँ ने बच्चे सहित की आत्महत्या

Web Summary : दिल दहला देने वाली घटना: सूरत में एक महिला ने तलाक के बाद अवसाद में आकर अपने 4 साल के बेटे की हत्या कर दी और फिर खुद भी आत्महत्या कर ली। परिवार ने पूर्व पति पर उत्पीड़न का आरोप लगाया है। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Love marriage, divorce, depression: Young mother commits suicide with child.

Web Summary : Heartbreaking: A Surat woman killed her 4-year-old son and then herself, driven by depression after a divorce. Family alleges harassment by her ex-husband. Police are investigating.