शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

हरवलेल्या मुलीचा दाेन तासांत घेतला शाेध; पाेलिसांनी केले पालकांच्या स्वाधीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 00:51 IST

राेजगाराच्या शाेधात अलिबाग-खंडाळे येथील नितीन नाईक कुटुंब वीटभट्टीच्या कामासाठी हमरापूर गावात गेले हाेते

रायगड : पेण तालुक्यातील हमरापूर येथून बेपत्ता झालेल्या ११ वर्षीय मुलीला पेण-दादर सागरी पाेलिसांनी दाेन तासात शाेधून काढले. वडील रागावल्याने मुलगी रागाने घरातून निघून गेली हाेती. मुलीला पाेलिसांनी तीच्या पालकाच्या स्वाधीन केले.

पेण तालुक्यामध्ये सध्या विटभट्टीच्या व्यवसायाला तेजी आली आहे. राेजगाराच्या शाेधात अलिबाग-खंडाळे येथील नितीन नाईक कुटुंब वीटभट्टीच्या कामासाठी हमरापूर गावात गेले हाेते. रविवारी संध्याकाळी त्यांची ११ वर्षीय निकीता नितीन नाईक ही मुलगी खाऊ आणण्यासाठी हमरापूर गावात गेली होती. ती उशिरा आल्याने तिचे वडील तिला ओरडले. त्यामुळे रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रागाने घरातून निघून गेली. बिबट्याच्या अफवेची दहशत आणि रात्रीचे ११ वाजले तरी आपली मुलगी घरी न आल्याने तिची आई शांता नाईक हिने थेट जोहे गावातील दादर सागरी पोलीस स्टेशन गाठून पाेलिसांकेड तक्रार दाखल केली.

दादर सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हमरापूर जंगल भागात शोधाशोध सुरू केली. ‘घरी गेलो तर वडील मारतील’ या भीतीने निकीता ही झाडांच्या मागे घाबरून लपून बसलेली त्यांना दिसली. 

आईच्या ताब्यात दिलेतिला धीर देऊन तिच्या आईच्या ताब्यात सुखरूप दिले. पाेलिसांनी दाेन तासांतच मुलीला शाेधून काढल्याने पाेलिसांचे आभार मानन्यात येत आहेत. पोलीस उपनिरीक्षक के.आर.भऊड, सहाय्यक फौजदार शिवाजी म्हात्रे, हवालदार रवि मुंडे, होमगार्ड आदेश पाटील यांच्या पथकाने कल्पेश ठाकूर यांच्या सहकार्याने शोध घेतला.

टॅग्स :Policeपोलिस