लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या बापाविरोधात लेकाने केली तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 18:58 IST2020-04-03T18:55:47+5:302020-04-03T18:58:51+5:30

Lockdown : दिल्ली पोलिसांनी बुधवारी (1 एप्रिल) पर्यंत 4053 लोकांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे. 

In lockdown son registered complaint in police against father who breaks rules pda | लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या बापाविरोधात लेकाने केली तक्रार 

लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या बापाविरोधात लेकाने केली तक्रार 

ठळक मुद्देलॉकडाउनच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या आरोपी वडिलांचे नाव वीरेंद्र सिंह आहे. अभिषेक एका ऑटोमोबाईल कंपनीत काम करतो."बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिसांनी आयपीसीच्या कलम १८८ अन्वये दिल्लीत २९ गुन्हे दाखल केले

नवी दिल्ली - दिल्लीच्या वसंत कुंज भागात एका मुलाने लॉकडाऊन उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली आपल्या वडिलांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मुलाने असा आरोप केला आहे की त्याचे वडील लॉकडाउनच्या नियमांचे पालन करीत नाहीत आणि वारंवार घराबाहेर जात असतात. मुलाचे नाव अभिषेक तर लॉकडाउनच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या आरोपी वडिलांचे नाव वीरेंद्र सिंह आहे. अभिषेक एका ऑटोमोबाईल कंपनीत काम करतो.


लॉकडाऊनच्या नियमांचे  उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी बुधवारी (1 एप्रिल) पर्यंत 4053 लोकांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे.  नंतर कायदेशीर कारवाई व तंबी देऊन या सर्वांना घरी पाठवण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एसीपी अनिल मित्तल यांनी बुधवारी सायंकाळी सांगितले की, "बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिसांनी आयपीसीच्या कलम १८८ अन्वये दिल्लीत २९ गुन्हे दाखल केले."

बुधवारी दिल्ली पोलिसांनी दिल्ली पोलिस कायद्याच्या कलम ६६ नुसार ५१५ वाहने जप्त केली आहेत. तर १ एप्रिल रोजी म्हणजेच बुधवारी १०२२ मुव्हमेंट पास बुधवारी वेगवेगळ्या जिल्ह्यात देण्यात आले.

 

Web Title: In lockdown son registered complaint in police against father who breaks rules pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.