Lockdown : बेकायदेशीरपणे दारू विकणाऱ्या बारवर छापा, दीड लाखाचा मद्यसाठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 20:35 IST2020-04-03T20:34:36+5:302020-04-03T20:35:56+5:30
Lockdown : 1 लाख 31 हजार रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

Lockdown : बेकायदेशीरपणे दारू विकणाऱ्या बारवर छापा, दीड लाखाचा मद्यसाठा जप्त
नवी मुंबई - वाशीत दारू विक्री करणाऱ्या बारवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. त्याठिकाणावरून 1 लाख 31 हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
वाशी सेक्टर 10 येथील संजोग बारमध्ये दारू विक्री सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. लॉकडाऊन असतानाही बेकायदशीर पने दारू विकली जात होती. त्यानुसार वाशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी तीन वेटरच्या मदतीने त्याठिकाणी दारू विकली जात असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी बारवर कारवाई करून तिघा वेटरला अटक केली आहे. तर बारमधून 1 लाख 31 हजार रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली आहे.