शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

जीव मुठीत धरून पळणाऱ्या तरुणावर चाकूनं सपासप वार; हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 4:39 PM

वर्दळीच्या रस्त्यावर तरुणाची निर्घृण हत्या; पोलिसांकडून आरोपीला अटक

मुरादाबाद: उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमध्ये एका तरुणाची भररस्त्यात चाकूनं सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा लाईव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरूनच अटक केली आहे.

कोणत्याही प्रकारचं पूर्ववैमनस्य नव्हतं. सगळं प्रकरण संपलं होतं, असा दावा घटनास्थळी पोहोचलेल्या मृताच्या मोठ्या भावानं केला. आरोपीला माझ्या समोर आणा. सगळं शत्रुत्वच संपवतो. मग तुम्ही किती पण ताकद लावा, अशी धमकीदेखील त्यानं दिली आहे. मृताचा मोठा भाऊ नेमकं कोणतं शत्रुत्व संपवण्याची धमकी देत आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.लाज नाही वाटत तुला? हिंदू तरुणासोबत बाईकवरून जाणाऱ्या मुस्लिम महिलेला दोघांनी रोखलं

मुरादाबादमधल्या वर्दळीच्या रस्त्यावर एका तरुणानं जाहिद नावाच्या तरुणावर धारदार चाकूनं हल्ला केल्यानंतर परिसरात खळबळ माजली. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर जाहिद तिथून जीव वाचवण्यासाठी पळू लागला. मात्र आरोपीनं त्याचा पाठलाग करत चाकूनं सपासप वार केले. जाहिद ई रिक्षा चालवायचा.

चाकू हल्ल्यात जखमी झालेला जाहिद रस्त्यावर पडला. परिसरात मोठी गर्दी जमताच आरोपीनं तिथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न अपयशी ठरला. पोलिसांनी त्याला अटक केली. गंभीर जखमी झालेल्या जाहिदला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. मात्र तो काहीच बोलत नव्हता.