Bhopal Live in Partner Murder: रितिका आणि सचिन यांचं एकमेकांवर प्रेम होतं. मागील साडेतीन वर्षांपासून दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पण, त्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि सचिनने रितिकाचा गळाच दाबला आणि जीवच घेतला. सचिनने रितिकाची हत्या केली. दोन दिवस तिचा मृतदेह भाड्याने राहत असलेल्या फ्लॅटमध्येच होता. तो मृतदेहाजवळच दोन दिवस झोपला. त्यानंतर मित्रासोबत दारू प्यायला. त्याने मित्राला ही गोष्ट सांगितली, पण दारूच्या नशेत बडबडतोय म्हणून मित्राने लक्ष दिले नाही. त्यानंतर हे प्रकरण समोर आले. या घटनेने भोपाळ हादरले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रितिका सेन (वय २९) मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर सचिन राजपूत (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. सचिनने रितिकाची शनिवार-रविवारच्या मध्यरात्री हत्या केली. सोमवारी ही घटना समोर आली.
बेडशीटमध्ये गुंडाळला मृतदेह
सचिन आणि रितिकामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाद होत होते. शनिवारी भांडण सुरू असतानाच सचिनने रितिकाचा गळा आवळला आणि हत्या केली. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह बेडवरील चादरीमध्ये गुंडळला आणि दोरीने बांधून ठेवला. त्यानंतर तो मृतदेहाशेजारीच झोपला.
वाचा >>पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या; मृत्यूपूर्वी इमारतीखाली होते भांडत, कारण अस्पष्ट
सोमवारी तो कामावर गेला. परतल्यानंतर रात्री मित्रासोबत दारू प्यायला. नशेत असताना सचिनने त्याला सांगितले की, रितिकाची हत्या केली. पण, दारूच्या नशेत बोलत असल्याचे समजून मित्राने दुर्लक्ष केले. पण पुन्हा त्याने हत्येबद्दल सांगितले. त्यामुळे मित्र त्याच्यासोबत घरी गेला. तिथे रितिकाचा मृतदेह त्याने बघितला.
सचिनने सांगितले रितिकाच्या हत्येचे कारण
मृतदेह बघताच त्याने पोलिसांना कॉल करून याची माहिती दिली. दोन दिवसात मृतदेह सडू लागला होता. पोलिसांनी तो ताब्यात घेतला. पोलिसांनी आरोपीला सचिनला अटक केली. त्याने हत्येची कबुली दिली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत सचिनने सांगितले की गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या दोघांमध्ये वाद होत होते. त्याला तिला सोडायचे होते, पण रितिका त्यला सोडण्यास तयार नव्हती. शनिवारी तो दारू प्यायला आणि घरी गेला. त्यावरून रितिकाचे आणि त्याचे भांडण झाले. वाद सुरू असतानाच त्याने रितिकाचा गळा दाबला. त्यातच तिचा मृत्यू झाला.