किरकोळ वादातून प्रियकराने प्रेयसीला ढकलले विहिरीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 21:18 IST2018-11-09T21:18:11+5:302018-11-09T21:18:23+5:30

 कळंभीर येथील गोरख काशिनाथ थोरात याचे काशीपूर येथील मीना राजू मारणार (वय १८) या मुलीशी प्रेमसंबंध होते. ती शिक्षण घेत असल्याने आरोपीशी लग्न करण्यास मुलीच्या कुटुंबियांचा विरोध होता. 

Little love pushed a lover to a lovelier well in the well | किरकोळ वादातून प्रियकराने प्रेयसीला ढकलले विहिरीत 

किरकोळ वादातून प्रियकराने प्रेयसीला ढकलले विहिरीत 

साक्री (जि. धुळे) -  तालुक्यातील काशीपूर येथे प्रेमसंबंधातून एका तरुणीची हत्या करण्यात आल्याचा गुन्हा साक्री पोलिसात दाखल झाला आहे. कळंभीर येथील गोरख काशिनाथ थोरात याचे काशीपूर येथील मीना राजू मारणार (वय १८) या मुलीशी प्रेमसंबंध होते. ती शिक्षण घेत असल्याने आरोपीशी लग्न करण्यास मुलीच्या कुटुंबियांचा विरोध होता. यासंदर्भात काल आरोपी हा काशीपूर येथे मुलीला भेटण्यासाठी आला असताना त्या दोघांमध्ये चर्चा झाली आणि चर्चेचे पर्यवसन वादात झाले. या वादातून आरोपीने घराजवळील विहिरीत मुलीला ढकलून दिले व तेथून फरार झाला. अशी फिर्याद मुलीचे वडील राजू चिंता मारणार यांनी आज सकाळी दिली आहे. यावरून पोलिसांनी आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे हे करत आहेत.

Web Title: Little love pushed a lover to a lovelier well in the well