पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 09:15 IST2025-10-06T09:15:11+5:302025-10-06T09:15:38+5:30
प्रियकराला मैत्रिणीसोबत एका हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडल्यानंतर धक्क्यात असलेल्या या महिलेनं टोकाचं पाऊल उचललं.

पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
प्रेमसंबंधातील धोका एका विवाहित महिलेच्या जीवावर बेतला असल्याची हृदयद्रावक घटना कर्नाटकातीलबेंगळूरु येथे घडली आहे. प्रियकराला मैत्रिणीसोबत एका हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडल्यानंतर धक्क्यात असलेल्या या महिलेनं त्याच लॉजमध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
बसवेश्वर नगर येथील ओयो चॅम्पियन कम्फर्ट लॉजमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे. यशोदा असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. यशोदा विवाहित असून, तिला दोन मुलं आहेत.
७ वर्षांचं नातं, पण मैत्रिणीमुळे तुटलं!
या प्रकरणी समोर आलेल्या माहितीनुसार, विवाहित असूनही यशोदाचं तिच्या शेजारी राहणाऱ्या विश्वनाथ नावाच्या ऑडिटरसोबत प्रेमसंबंध होते. जवळपास सात वर्षांपासून त्या दोघांचं हे अनैतिक प्रेमप्रकरण सुरू होतं. मात्र, काही महिन्यांपूर्वी यशोदानं स्वतःच्या एका मैत्रिणीची ओळख विश्वनाथशी करून दिली.
या ओळखीनंतर विश्वनाथ आणि यशोदाच्या मैत्रिणीमध्ये चोरून भेटीगाठी सुरू झाल्या. हळूहळू यशोदाला या दोघांच्या प्रेमप्रकरणाची शंका येऊ लागली. याच संशयातून यशोदानं त्यांचा मागोवा घेतला.
प्रियकराला रंगेहाथ पकडलं आणि...
शेवटी, यशोदाला कळालं की विश्वनाथ आणि तिची मैत्रीण बसवेश्वर नगरमधील केएचबी कॉलनी येथील ओयो चॅम्पियन कम्फर्ट लॉजमध्ये एकत्र आहेत. यशोदानं तत्काळ लॉज गाठलं आणि तिथे तिने दोघांनाही रंगेहाथ पकडलं.
यावेळी तिघांमध्ये जोरदार वादविवाद झाले. प्रियकरानं दिलेल्या या धोक्यामुळे यशोदा पूर्णपणे हादरली होती. तिनं त्याच लॉजमध्ये विश्वनाथच्या बाजूचा एक खोली बुक केली आणि खोलीत जाऊन पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शव ताब्यात घेऊन ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं आहे, तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.