हळहळ! गेल्या ३ महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने वकिलाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 20:38 IST2020-06-27T20:35:33+5:302020-06-27T20:38:14+5:30
या प्रकाराने वकील संघटनेने दुःख व्यक्त केले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हळहळ! गेल्या ३ महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने वकिलाची आत्महत्या
उल्हासनगर : गेल्या तीन महिन्यांपासून वकिलाचा व्यवसाय बंद असल्याने आर्थिक विवेचनातून एका वकिलाने शुक्रवारी आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आकस्मित गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-१ जुना बस स्टॉप येथील एका इमारतीत वकील उमेश खंडागळे -३७ कुटुंबासह राहतात. कोरोनाच्या महामारी दरम्यान देशभरातील कनिष्ठ न्यायालय बंद आहे. त्यामुळे आर्थिक विवेंचनात सापडलेले व नैराश्यातून वकील उमेश खंडागळे यांनी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश कदम यांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी व ३ वर्षाची मुलगी आहे. या प्रकाराने वकील संघटनेने दुःख व्यक्त केले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस चौकशीत नैराश्य व आर्थिक विवेचनातून आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश कदम यांनी दिली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा
लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल
हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना
बापरे! आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केली मुलाची हत्या
भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला
नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न
Coronavirus News : कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन केलेल्या युवकाची आत्महत्या