शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 13:32 IST

Elvish Yadav Firing news: बाइकवरून आलेल्या तीन अज्ञात लोकांनी घराजवळ थांबून सुमारे १० ते १२ गोळ्या झाडल्या होत्या. गोळीबारावेळी एल्विश घरात नव्हता, परंतू घरात त्याचा एक कर्मचारी आणि इतर काही लोक उपस्थित होते.

यूट्यूबर आणि बिग बॉस विजेता एल्विश यादव याच्या गुरुग्राममधील घराबाहेर रविवारी (१७ ऑगस्ट) पहाटे गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबाराची जबाबदारी भाऊ गँगने घेतली असून सुमारे डझनभर गोळ्या त्याच्या घरावर झाडण्यात आल्या आहेत. याचे कारणही भाऊ गँगने सांगितले आहे. 

बाइकवरून आलेल्या तीन अज्ञात लोकांनी घराजवळ थांबून सुमारे १० ते १२ गोळ्या झाडल्या होत्या. गोळीबारावेळी एल्विश घरात नव्हता, परंतू घरात त्याचा एक कर्मचारी आणि इतर काही लोक उपस्थित होते. पोलिसांनी CCTV फुटेजवरून गुन्हेगारांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. आरोपींनी हेल्मेट घातलेले होते. यामुळे ओळख पटवणे कठीण झाले आहे.

एल्विश यादवच्या गुरुग्राममधील घरावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला त्याची जबाबबारी नीरज फरीदपूर आणि भाऊ रीतुलिया या गुंडांनी घेतली आहे. नीरज आणि भाऊ दोघेही गँगस्टर हिमांशू भाऊ टोळीशी संबंधित आहेत. या गँगला भाऊ गँग म्हणून ओळखले जाते. एल्विश यादवने एका बेटिंग अ‍ॅपची जाहिरात केली आहे. या बेटिंग अ‍ॅपने अनेक घरे उद्ध्वस्त केली आहेत. एल्विश यादव अशा अ‍ॅपची जाहिरात करत आहे. म्हणूनच त्याच्या घरी गोळीबार करण्यात आला आहे, असे या भाऊ गँगने सोशल मीडियावरील पोस्टवर म्हटले आहे. 

हिमांशू भाऊ कोण आहे?पोर्तुगालमध्ये राहणारा गुंड हिमांशू भाऊ भारतात ३० हून अधिक गुन्हेगारी आणि संघटित गुन्ह्यांमध्ये हवा आहे. हिमांशू भाऊचा गुन्हेगारी प्रवास १७ वर्षांचा होता. तो खून, खंडणी आणि हत्येचा प्रयत्न यासारख्या विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी होता. तो बनावट पासपोर्टवर भारतातून दुबईला पळून गेला आणि नंतर पोर्तुगालला स्थलांतरित झाला आहे.   

टॅग्स :Firingगोळीबार