Lawrence Bishnoi Gang: बॉलिवूडचा 'भाईजान' Salman Khan ची सुपारी घेणाऱ्या बिश्नोई गँगने केली बड्या गँगस्टरची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 13:12 IST2022-12-03T13:10:53+5:302022-12-03T13:12:38+5:30

भरदिवसा रस्त्यात चार जणांनी गोळ्या झाडून केली हत्या

Lawrence Bishnoi group who plotted plan to Kill Bollywood Actor Salman Khan claims responsibility after gangster Raju Theth shot dead in Rajasthan | Lawrence Bishnoi Gang: बॉलिवूडचा 'भाईजान' Salman Khan ची सुपारी घेणाऱ्या बिश्नोई गँगने केली बड्या गँगस्टरची हत्या

Lawrence Bishnoi Gang: बॉलिवूडचा 'भाईजान' Salman Khan ची सुपारी घेणाऱ्या बिश्नोई गँगने केली बड्या गँगस्टरची हत्या

Lawrence Bishnoi Gang, Salman Khan: राजस्थानमधील सीकरमध्ये पुन्हा एकदा गँगवॉरची घटना समोर आली. बॉलिवूड अभिनेता सलमान खानला ठार मारण्याचा प्लॅन करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गँगने राजस्थानात एका गँगस्टरची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येची जबाबदारी घेतलेल्या बिश्नोई गँगनेच राजस्थानी गँगस्टर राजू थेठ (Gangster Raju Theth) याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना सीकरमधील उद्योग नगर भागात घडली. राजू थेठ याची त्याच्या घराजवळ अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. लॉरेन्स बिश्नोई गँगने हत्येच्या नंतर दोन तासांतच या घटनेची जबाबदारी घेतली. एका फेसबुक पोस्टमध्ये, बिश्नोई गँगचा रोहित गोदारा याने हत्येची जबाबदारी घेतली. बलवीर आणि आनंदपाल यांच्या हत्येचा हा बदला घेतला गेला, असेही त्याने सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंदपाल टोळीत राजू थेठचे पहिले वैर सुरू होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आनंदपाल गँग आणि लॉरेन्स बिश्नोई टोळी एकत्र काम करत होती. लॉरेन्स टोळीचा हिस्ट्री शीटर रोहित गोदारा याने राजू थेठच्या मृत्यूची जबाबदारी घेतली आहे. तसेच आनंदपाल आणि बलवीर यांच्या हत्येचा बदला घेण्यात आल्याचे सांगितले. या हत्येची जबाबदारी रोहित गोदरा या फेसबुक आयडीवरून घेण्यात आली आहे. आनंदपाल आणि बलबीर बानुदा यांच्या हत्येचा बदला घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. रोहित गोदाराने लिहिले आहे की, मी हत्येची जबाबदारी घेतो, बदला पूर्ण झाला आहे.

हत्येचा व्हिडीओही आला समोर

आज घडलेल्या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे हल्लेखोर बिनदिक्कत गोळीबार करत असल्याचे स्पष्ट होत आहे. व्हिडिओमध्ये चार आरोपी दिसत आहेत. चौघांच्याही हातात शस्त्रे आहेत. आरोपींनी राजू थेठ याच्यावर गोळीबार सुरू करताच तेथे चेंगराचेंगरी झाली. गोळ्यांचा आवाज ऐकून लोक धावू लागतात. त्याचवेळी गोळीबार करून आरोपी अगदी आरामात पुढे निघून जातात. यादरम्यान एका आरोपीने हवेत गोळीबार केल्याचेही दिसते.

 

Web Title: Lawrence Bishnoi group who plotted plan to Kill Bollywood Actor Salman Khan claims responsibility after gangster Raju Theth shot dead in Rajasthan