In the last six years in the local police stolen eight crores of gold chain, chain snatching | लोकलमध्ये गेल्या सहा वर्षात ८ कोटींच्या सोनसाखळ्या गेल्या चोरीस   

लोकलमध्ये गेल्या सहा वर्षात ८ कोटींच्या सोनसाखळ्या गेल्या चोरीस   

ठळक मुद्देगुन्हयात कोणत्याही प्रकारची विशेष कमी आली नाही. त्याउलट वाढले आहे. फक्त 40 टक्के किंमतीच्या मालमत्ता मिळाले आहेत. मुंबईत 1 जानेवरी 2013 पासून डिसेंबर 2018 पर्यंत एकूण 2084 सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची झाली असून एकूण सहा वर्षात 8 कोटी 28 लाख 24 हजार 399 रुपये किंमतीच्या इतकी किंमतीच्या मालमत्ता चोरी झाले आहे

मुंबई - रेल्वे स्टेशनावर सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईत कोट्यावधी रुपये खर्च करुन प्रत्येक रेल्वे स्टेशन परिसरात कॅमरे लावण्यात आले आहेत. तरीसुद्धा गुन्हयात कोणत्याही प्रकारची विशेष कमी आली नाही. त्याउलट वाढले आहे. कारण सहा वर्षात 8 कोटी 28 लाख 24 हजार 399 रुपये किंमतीच्या सोनसाखळी चोरीच्या घटना नोंद झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांस लोहमार्ग पोलीस विभागांनी दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी लोहमार्ग पोलीस विभागाकडे  2013 पासून 2018  पर्यंत मुंबईच्या उपनगरीय रेल्वे हद्दीत किती सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तसेच किती गुन्ह्यांची उकल झाली आहे तसेच किती किंमतीच्या मालमत्ता चोरी झाली आहे. तसेच पोलिसांनी किती किंमतीच्या मालमत्ता किंवा हस्तगत केली आहे. याबाबत माहिती अधिकारांतर्गत माहिती विचारली होती. या माहिती संदर्भात लोहमार्ग पोलीस विभागाचे शासकीय माहिती अधिकरी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी शकील अहमद शेख यांस माहिती दिलेली आहे. दिलेल्या माहितीप्रमाणे मुंबईत 1 जानेवरी 2013 पासून डिसेंबर 2018 पर्यंत एकूण 2084 सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची झाली असून एकूण सहा वर्षात 8 कोटी 28 लाख 24 हजार 399 रुपये किंमतीच्या इतकी किंमतीच्या मालमत्ता चोरी झाले आहे. तसेच फक्त 860 गुन्ह्याची उघड झाली असून पोलिसांना फक्त 3 कोटी 32 लाख 39 हजार 921 रुपये इतकी किंमतीच्या मालमत्ता मिळाले आहेत. म्हणजे फक्त 40 टक्के किंमतीच्या मालमत्ता मिळाले आहेत. 

वर्षानिहाय सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद

2013 मध्ये एकूण 62 सोनसाखळी चोरीच्या घटनेत 2037885/- रुपये किंमतीच्या मालमत्ता चोरी झाले असून फक्त 17  गुन्हे उघड झाले आहे. तसेच 693250/- इतकी किंमतीच्या मालमत्ता परत मिळाली आहे.  

2014 मध्ये एकूण 73 सोनसाखळी चोरीच्या घटनेत 2367789/- रुपये किंमतीच्या मालमत्ता चोरी झाले असून फक्त 31  गुन्हे उघड झाले आहे. तसेच 953607/- इतकी किंमतीच्या मालमत्ता परत मिळाली आहे.  

2015 मध्ये एकूण 244  सोनसाखळी चोरीच्या घटनेत  8692576/- रुपये किंमतीच्या मालमत्ता चोरी झाले असून फक्त 77  गुन्हे उघड झाले आहे. तसेच 2264043/- इतकी किंमतीच्या मालमत्ता परत मिळाली आहे.  

2016 मध्ये एकूण 309  सोनसाखळी चोरीच्या घटनेत 12053333/- रुपये किंमतीच्या मालमत्ता चोरी झाले असून फक्त 123  गुन्हे उघड झाले आहे तसेच 3371908/- इतकी किंमतीच्या मालमत्ता परत मिळाली आहे.   .   

2017 मध्ये एकूण 341  सोनसाखळी चोरीच्या घटनेत  14292631/- रुपये किंमतीच्या मालमत्ता चोरी झाले असून फक्त 128  गुन्हे उघड झाले आहे तसेच 4033259/- इतकी किंमतीच्या मालमत्ता परत मिळाली आहे.      

2018 मध्ये एकूण 314  सोनसाखळी चोरीच्या घटनेत  14927222/- रुपये किंमतीच्या मालमत्ता चोरी झाले असून फक्त 80  गुन्हे उघड झाले आहे तसेच 3032343/- इतकी किंमतीच्या मालमत्ता  परत मिळाली आहे.      

वर्षाप्रमाणे सोनसाखळी चोरी जबरीचोरी गुन्ह्यांची नोंद

2013 मध्ये एकूण 273  सोनसाखळी चोरीच्या घटनेत  10883982/- रुपये किंमतीच्या मालमत्ता चोरी झाले असून फक्त 144  गुन्हे उघड झाले आहे तसेच 4065706/- इतकी किंमतीच्या मालमत्ता  परत मिळाली आहे.      

2014 मध्ये एकूण 254  सोनसाखळी चोरीच्या घटनेत  10346988/- रुपये किंमतीच्या मालमत्ता चोरी झाले असून फक्त 133  गुन्हे उघड झाले आहे तसेच 3772819/- इतकी किंमतीच्या मालमत्ता  परत मिळाली आहे.      

2015 मध्ये एकूण 160 सोनसाखळी चोरीच्या घटनेत  7219135/- रुपये किंमतीच्या मालमत्ता चोरी झाले असून फक्त 86  गुन्हे उघड झाले आहे तसेच 3115036/- इतकी किंमतीच्या मालमत्ता  परत मिळाली आहे.       

2016 मध्ये एकूण 8 सोनसाखळी चोरीच्या घटनेत  436000/- रुपये किंमतीच्या मालमत्ता चोरी झाले असून फक्त 6 गुन्हे उघड झाले आहे तसेच 254000/- इतकी किंमतीच्या मालमत्ता परत मिळाली आहे.  

2017 मध्ये एकूण 26 सोनसाखळी चोरीच्या घटनेत  1138422/- रुपये किंमतीच्या मालमत्ता चोरी झाले असून फक्त 22 गुन्हे उघड झाले आहे तसेच 836548/- इतकी किंमतीच्या मालमत्ता परत मिळाली आहे.  

2018 मध्ये एकूण 20 सोनसाखळी चोरीच्या घटनेत 1211600/- रुपये किंमतीच्या मालमत्ता चोरी झाले असून फक्त 13 गुन्हे उघड झाले आहे तसेच 391100/- इतकी किंमतीच्या मालमत्ता  परत मिळाली आहे.शकील अहमद शेख यांचे मते लोकांचे सुरक्षेसाठी पोलीस विभागास अजूनही ठोस पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. तसेच २४ तास मॅन्युअली सीसीटीव्हीवर नजर ठेवण्यायाची गरज आहे.

Web Title: In the last six years in the local police stolen eight crores of gold chain, chain snatching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.