ललिताबाई कुठेच दिसल्या नाही, कुलुप बंद खोली; खिडकी उघडल्यावर..., हत्येने परिसर हादरला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 18:41 IST2023-01-03T18:40:26+5:302023-01-03T18:41:03+5:30
उरण येथील ललिता ठाकूर या ६४ वर्षीय वृध्द विधवा महिलेची हत्या झाली आहे.

ललिताबाई कुठेच दिसल्या नाही, कुलुप बंद खोली; खिडकी उघडल्यावर..., हत्येने परिसर हादरला!
- मधुकर ठाकूर
उरण: येथील ललिता ठाकूर या ६४ वर्षीय वृध्द विधवा महिलेची हत्या झाली आहे. नवीन वर्षांच्या स्वागताच्या सुरवातीलाच घडलेल्या या हत्येमुळे बोकडवीरा गाव चांगलेच हादरले आहे.
बोकडवीरा येथे ललिता ठाकूर ही ६४ वर्षीय वृध्द विधवा महिला एकटीच राहात होती.पतीच्या निधनानंतर कुणीही नसलेली वृंध्दा येथील खासगी शाळेत मोलमजुरी तसेच मालकीच्या तीन खोल्यांपैकी दोन खोल्या भाड्याने देऊन मिळणाऱ्या उत्पन्नातूनच आपली उपजीविका करीत होती. मंगळवारी ( ३) सकाळी शाळा उघडण्यासाठी शाळेची चावी आणण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला ललिताबाई आढळून आल्या आल्या नाहीत.
घरबंद असल्याने शेजारी व आसपासच्या घरातील लोकांकडूनही ललिताबाई दिसल्या नसल्याने सांगण्यात आले. त्यामुळे शेजाऱ्यांनी चौकशी करण्यास सुरुवात केली असताना कुलुप बंद खोलीची खिडकी उघडली असताना सदर महिला जमिनीवर निपचित पडलेली दिसली. तिचे हातपायही रस्सीखेच करकचून बांधलेले होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
ललिताबाई यांच्या शेजारचीच खोली मोलमजुरी करणाऱ्या अमोल सर्जेराव शेलार या इसमाला भाड्याने दिली आहे.त्याच खोलीत ललिताबाई यांची हत्या झाली आहे. हत्येनंतर खोलीला बाहेरून कुलूप लावण्यात आले आहे. भाडोत्री अमोल सर्जेराव शेलार घटनेपासूनच फरार झाला आहे. ललिताबाई यांच्याशी भाडोत्र्याबरोबर भांडण झाले होते .या वादातूनच खून झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब, फिंगरप्रिंट,श्वान पथक दाखल झाले आहे. त्यांच्याकडून तपासणी सुरू आहे.अद्यापही कशामुळे आणि कशी हत्या झाली आहे हे सांगणे कठीण आहे.मात्र शवविच्छेदनानंतरच नेमक्या कारणांची माहिती मिळेल.दरम्यान संशयित फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली. नवीन वर्षांच्या स्वागताच्या सुरवातीलाच घडलेल्या महिलेच्या हत्येमुळे बोकडवीरा गाव चांगलेच हादरले आहे.