शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कॉल, ५ लाखांची खंडणी अन् बांधलेल्या अवस्थेतील फोटो; शिक्षिकेला किडनॅप केल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 13:25 IST

छत्तीसगडमधील दुर्ग येथील भिलाईच्या एका शिक्षिकेचं अपहरण करण्यात आलं.

छत्तीसगडमधील दुर्ग येथील भिलाईच्या एका शिक्षिकेचं अपहरण करण्यात आलं. ती शाळेसाठी घरून निघाली होती आणि रिक्षाने कामावर जात असताना तिचं अपहरण करण्यात आलं. काही तासांनंतर अपहरणकर्त्याने तिच्या पतीला फोन करून पाच लाख रुपयांची खंडणी मागितली आणि तिचा बांधलेल्या अवस्थेतील फोटो पाठवला. अचानक आलेल्या या कॉल आणि फोटोमुळे पती आणि कुटुंबीय घाबरले. घाबरलेल्या पतीने ताबडतोब भिलाई कॅन्टोन्मेंट पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना घटनेची माहिती दिली.

कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार की, महिला नेहमीप्रमाणे भिलाई सेक्टरमधील तिच्या खासगी शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली होती. शाळेच्या व्यवस्थापनाने शिक्षिक आली नसल्याचं सांगण्यासाठी फोन केल्यावर पतीला संशय आला. तपास सुरू असतानाच एक कॉल आला. अपहरणकर्त्याने फोनवर स्पष्टपणे सांगितलं की, "आम्ही तुमच्या पत्नीचं अपहरण केलं. ५ लाख रुपये आणा, नाहीतर तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील." अपहरणकर्त्याने पुरावा म्हणून महिलेचा फोटो देखील पाठवला होता.

तक्रार मिळताच, दुर्ग पोलिसांनी कारवाई सुरू केली. तांत्रिक आणि मानवी संसाधनांच्या आधारे एसीसीयू टीम आणि कॅन्टोन्मेंट पोलीस स्टेशनने संयुक्त तपास सुरू केला. काही तासांतच पोलिसांनी एका संशयित रिक्षा चालकाला शोधून काढलं, ज्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली. संशयिताच्या माहितीनंतर पोलिसांनी शिक्षिकेला सुरक्षितपणे शोधून काढलं.

महिलेला सुरक्षित आढळल्यानंतर कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास सोडला. सुरुवातीच्या तपासात रिक्षा चालकाने तिचं अपहरण केल्याचं उघड झालं. ही घटना केवळ खंडणीसाठी घडली होती की इतर काही हेतू होता याचा तपास पोलस आता करत आहेत. महिला आणि आरोपी दोघांचीही चौकशी केली जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Teacher Kidnapped for Ransom in Chhattisgarh; Photo Sent to Husband

Web Summary : A Chhattisgarh teacher was kidnapped on her way to school. The kidnappers demanded ₹5 lakh ransom and sent a photo of her bound. Police rescued her and arrested a suspect. Investigation is ongoing.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगडTeacherशिक्षकKidnappingअपहरणPoliceपोलिस