शाब्बास! आत्महत्या करणाऱ्या महिलेचे पोलिसाने वाचविले प्राण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 19:31 IST2019-01-05T19:26:13+5:302019-01-05T19:31:44+5:30

चार दिवसांपूर्वी ही घटना मध्य रेल्वेच्या विक्रोळी रेल्वे स्थानकात घडली होती. आत्महत्येचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Lady police survives the woman who committed suicide | शाब्बास! आत्महत्या करणाऱ्या महिलेचे पोलिसाने वाचविले प्राण 

शाब्बास! आत्महत्या करणाऱ्या महिलेचे पोलिसाने वाचविले प्राण 

ठळक मुद्देचार दिवसांपूर्वी ती महिला दुपारच्या सुमारास सहा वर्षांच्या मुलासोबत विक्रोळी रेल्वे स्थानकात आली.प्रवाशी आणि कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याच्या महिला शिपाई साक्षी यांनी तेथे धाव घेतली.

मुंबई - कौटुंबिक कारणावरून ६ वर्षीय मुलीला घेऊन लोकलखाली आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या महिलेचे कुर्ला रेल्वेपोलिसांनी प्राण वाचवले आहेत. चार दिवसांपूर्वी ही घटना मध्य रेल्वेच्या विक्रोळी रेल्वे स्थानकात घडली होती. आत्महत्येचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

चार दिवसांपूर्वी ती महिला दुपारच्या सुमारास सहा वर्षांच्या मुलासोबत विक्रोळी रेल्वे स्थानकात आली. फलाट क्रमांक दोनवर ती उभी होती. सीएसएमटीला जाणारी लोकल फलाटावर येत असल्याचे पाहून महिलेने तिच्या मुलीसह रुळावर उडी मारली. हा प्रकार काही रेल्वे प्रवाशांच्या लक्षात आला. प्रवाशी आणि कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याच्या महिला शिपाई साक्षी यांनी तेथे धाव घेतली. दरम्यान, मोटरमनने ब्रेक मारून लोकल थांबवली. त्या महिलेला पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली असता कौटुंबिक कारणामुळे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले.

Web Title: Lady police survives the woman who committed suicide