लाेकलमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्या भामट्याला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 14:42 IST2019-03-13T14:41:15+5:302019-03-13T14:42:18+5:30
गर्दीच्या वेळी महिलांच्या डब्यात घुसून त्यांना अश्लील स्पर्श करणाऱ्या एका तरुणास वडाळा पोलिसांनी अटक केली आहे.

लाेकलमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्या भामट्याला बेड्या
मुंबई - रेल्वेनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतो. महिलांच्या डब्यात गर्दुले, विकृत यांचा शिरकाव वारंवार आपल्याला पाहायला मिळतो. महिला प्रवाशांशी अश्लील वर्तन करणं आणि विनयभंगासारख्या अनेक तक्रारी अनेकदा समोर येत आहे. त्यातच काही महिन्यांपूर्वी भूज एक्स्प्रेसमध्ये एका महिलेची हत्याही झाली होती. तसेच लोकलमध्ये वारंवार महिला प्रवाशांना नेहमीच जीव मुठीत घेऊनच लोकल प्रवास करावा लागतो. त्यातच गर्दीच्या वेळी महिलांच्या डब्यात घुसून त्यांना अश्लील स्पर्श करणाऱ्या एका तरुणास वडाळा पोलिसांनीअटक केली आहे.
पीडित तरुणी ही पनवेनहून कुर्ला स्थानकावर उतरली असताना तिच्यासोबत हा प्रकार घडला. पोलीस चौकशीत शाहदाब मोहम्मद रईस शेख (२६) असे या विकृताचं नाव असल्याचं पुढं आलं आहे. विक्रोळी परिसरात राहणारा शाहदाब खासगी ठिकाणी नोकरी करत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. या प्रकरणी वडाळा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.