Labour death by drowning in the tank of water | पाण्याच्या टाकीत बुडून कामगाराचा मृत्यू
पाण्याच्या टाकीत बुडून कामगाराचा मृत्यू

ठळक मुद्देकंपनीमध्ये मंगळवारी दुपारी पाण्याच्या टाकीत पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.कंपनीमधील आजूबाजूच्या कामगारांनी खुशीहाल यांना बाहेर काढून प्लॅटिनियम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले.

नालासोपारा - वसई पूर्वेकडील वालीव विभागात असणाऱ्या एका कंपनीमध्ये मंगळवारी दुपारी पाण्याच्या टाकीत पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वालीव पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करत आहे. 

वसई पूर्वेकडील वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील डव इंजिफेब एलएलपी कंपनीत हेल्पर म्हणून काम करणारे खुशीहाल बहादूर रजक (६४) मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास पाण्याच्या टाकीत पडले. कंपनीमधील आजूबाजूच्या कामगारांनी खुशीहाल यांना बाहेर काढून प्लॅटिनियम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


Web Title: Labour death by drowning in the tank of water
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.