कुर्ल्यातून एमडी अमली पदार्थाचा साठा जप्त; एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 18:50 IST2019-02-15T18:50:16+5:302019-02-15T18:50:38+5:30
पेडलरकडे तब्बल 150 ग्रॅम वजनाचा व सहा लाख किंमतीचा एमडी या अमली पदार्थाचा साठा सापडला असून पोलिसांनी तो जप्त केला आहे.

कुर्ल्यातून एमडी अमली पदार्थाचा साठा जप्त; एकास अटक
मुंबई - कुर्ला परिसरातील नशेबाजांना एमडीचा साठा घेऊन आलेल्या एका पेडलरला अमली पदार्थविरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने रंगेहाथ अटक केली आहे. अटक पेडलरकडे तब्बल 150 ग्रॅम वजनाचा व सहा लाख किंमतीचा एमडी या अमली पदार्थाचा साठा सापडला असून पोलिसांनी तो जप्त केला आहे.