हायव्होल्टेज ड्रामा! नवऱ्याला सोडवण्यासाठी पोलीस ठाण्याच्या छतावर चढली बायको, तोल गेला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:50 IST2026-03-23T12:49:03+5:302026-03-23T12:50:13+5:30

एक महिला आपल्या पतीच्या सुटकेच्या मागणीसाठी थेट पोलीस ठाण्याच्या छतावर चढली.

kullu drunken wife video goes viral climbs police station roof to free husband Chaos ensues when she falls | हायव्होल्टेज ड्रामा! नवऱ्याला सोडवण्यासाठी पोलीस ठाण्याच्या छतावर चढली बायको, तोल गेला अन्...

फोटो - ndtv.in

हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिला आपल्या पतीच्या सुटकेच्या मागणीसाठी थेट पोलीस ठाण्याच्या छतावर चढली. या महिलेचा हा 'हाय-वोल्टेज ड्रामा' अनेक तास सुरू होता, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शांततेचा भंग केल्याप्रकरणी विकास बोध नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. विकास हा कुल्लू शहरात आपली पत्नी रितूसोबत राहतो. संतापलेली पत्नी पोलीस ठाण्यात पोहोचली आणि पतीला सोडण्याची मागणी करू लागली. बघता बघता तिने पोलिसांची नजर चुकवून थेट पोलीस ठाण्याच्या छतावर धाव घेतली आणि तिथे गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

महिलेला छतावर चढलेले पाहून पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आणि संयुक्त बचाव मोहीम  सुरू झाली. एकीकडे पोलीस तिला खाली उतरवण्यासाठी समजावून सांगत होते, तर दुसरीकडे महिला आपल्या मागणीवर ठाम होती. याच दरम्यान महिलेचा तोल गेला आणि ती थेट दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीत कोसळली.

दुसऱ्या मजल्यावरून पडल्यामुळे महिलेला दुखापत झाली आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत तिला तात्काळ उपचारासाठी कुल्लू येथील प्रादेशिक रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयातील प्राथमिक तपासणी आणि वैद्यकीय अहवालात ती महिला नशेमध्ये असल्याचं स्पष्ट झालं आहे. डॉक्टरांच्या मते महिलेला सध्या कोणतीही गंभीर बाह्य दुखापत झालेली नाही, परंतु खबरदारी म्हणून 'सीटी स्कॅन' करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाची कायदेशीर चौकशी करत आहेत. 

Web Title : पति को छुड़ाने पत्नी पुलिस स्टेशन की छत पर चढ़ी, गिरी!

Web Summary : कुल्लू में एक महिला अपने पति को छुड़ाने के लिए पुलिस स्टेशन की छत पर चढ़ गई। संतुलन बिगड़ने से वह गिर गई और घायल हो गई। बताया जा रहा है कि वह नशे में थी। जांच जारी है।

Web Title : Wife Climbs Police Station Roof to Free Husband, Falls!

Web Summary : In Kullu, a woman climbed a police station roof demanding her husband's release. She lost balance and fell, sustaining injuries. She was reportedly intoxicated. An investigation is underway.