मावळातदेखील कोयता गँगची दहशत! शिरगावमध्ये कोयत्याने वार करून लुटले 

By रोशन मोरे | Updated: January 13, 2023 22:30 IST2023-01-13T22:29:00+5:302023-01-13T22:30:23+5:30

पोलिसांनी अनोळखी चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Koyta gang's terror even in Maval Coyata stabbed and robbed in Shirgaon | मावळातदेखील कोयता गँगची दहशत! शिरगावमध्ये कोयत्याने वार करून लुटले 

मावळातदेखील कोयता गँगची दहशत! शिरगावमध्ये कोयत्याने वार करून लुटले 

पुणे शहरात कोयता गँगची दहशत असताना कोयत्याच्या साह्याने वार करून लुटल्याची घटना मावळातील साई लॉज, शिरगाव येथे गुरुवारी (दि.१२) घडली. या प्रकरणी सुकेन निमाय मंडल (वय २४, रा.शिरगाव) याने शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.१३) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी हे साईलॉजवर काम करत होते. तेंव्हा अचानक हातामध्ये कोयते घेऊन चार ते पाच जण लॉजमध्ये आले. त्यांनी काऊंटरमधील १६०० रुपये काढून घेतले. तसेच फिर्यादीची हाताच्या पंज्यावर कोयता मारून दुखापत केली. तसेच फिर्यादीच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावला. आरोपींनी कोयत्याच्या साह्याने लॉजमधील कॅमेरे, डिव्हीआरसीसीटिव्हचा पीसी फोडून नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Koyta gang's terror even in Maval Coyata stabbed and robbed in Shirgaon