शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

कोलकात्याचा ब्लॅकमेलर गोव्यात जेरबंद : फेसबुक फ्रेण्डचे शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 11:27 PM

फेसबुकवर फ्रेण्डशिप झाल्यानंतर विद्यार्थिनीसोबत शरीरसंबंध जोडणाऱ्या आणि नंतर या संबंधाची क्लीप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन एका तरुणीकडून चार लाख रुपये हडपणाऱ्या नराधमाला अखेर अंबाझरी पोलिसांनी शोधून काढले.

ठळक मुद्देशरीरसंबंधाची अश्लील क्लीप बनविलीतीन वर्षांपासून होता फरार, अंबाझरी पोलिसांनी बांधल्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फेसबुकवर फ्रेण्डशिप झाल्यानंतर विद्यार्थिनीसोबत शरीरसंबंध जोडणाऱ्या आणि नंतर या संबंधाची क्लीप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन एका तरुणीकडून चार लाख रुपये हडपणाऱ्या नराधमाला अखेर अंबाझरी पोलिसांनी शोधून काढले. तीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी गोव्यात दडून बसला होता. पोलिसांनी त्याच्या तेथे जाऊन मुसक्या बांधल्या.सौरभ विश्वनाथ मंडल (वय २४) असे आरोपीचे नाव असून, तो मूळचा टिटागड, कोलकाता येथील रहिवासी होय. तक्रार करणारी विद्यार्थिनी मूळची नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती शिक्षणाच्या निमित्ताने नागपुरात राहायची. आरोपी सौरभ मंडल सोबत तिची ११ जुलै २०१३ ला फेसबुकवरून ओळख आणि नंतर फ्रेण्डशिप झाली. त्यानंतर हे दोघे निरंतर ऑनलाईन संपर्कात राहू लागले. स्वत: कॉर्पोरेट कंपनीत अधिकारी आहो, असे सांगून विद्यार्थिनीला आरोपी सौरभने चांगल्या जॉबची ऑफर दिली. त्यामुळे ती त्याच्या चांगलीच जवळ गेली. आरोपी नागपुरात आला. प्रारंभी एलआयटी कॉलेज, अमरावती मार्ग परिसरात आणि नंतर रामदासपेठेतील हॉटेल चिदंबरा तसेच कोलकाता येथे नेऊन त्याने तरुणीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. यावेळी त्याने मोबाईलमध्ये अश्लील चित्रफित तयार केली. एवढेच नव्हे तर तरुणीचे विवस्त्रावस्थेत फोटोही काढले. ती चित्रफित आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला मोठ्या रकमेची मागणी करू लागला. तरुणीच्या घरची स्थिती चांगली असल्यामुळे आणि ती शिक्षणाच्या निमित्ताने नागपुरात राहत असल्याने तिला तिचे पालक महिन्याला मोठी रक्कम पाठवित होते. तीन वर्षांत तरुणीने तब्बल चार लाख रुपये आरोपी सौरभला दिले.अखेर नोंदवली तक्रारतरुणीकडून रक्कम मिळत असल्यामुळे ती आणखी मोठ्या स्वरूपात मिळावी म्हणून तो तिला ब्लॅकमेल करू लागला. तर, आता आपण अधिक रक्कम देऊ शकत नाही, असे सांगूनही आरोपी सौरभ ऐकत नसल्याचे पाहून तरुणी त्याला पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा देत होती. ते पाहून आरोपीने तिला बदनाम करण्यासाठी तिच्या नावाने परस्पर दुसरा जी-मेल आणि फेसबुक आयडी तयार केला आणि त्यावर तिचे विवस्त्रावस्थेतील फोटो अपलोड करण्याची धमकी देऊ लागला. तरुणीने हा प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला. तीने धीर दिल्यानंतर आईवडिलांना सदर प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०१६ ला अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केल्याची कुणकुण लागताच आरोपीने आपले सर्व संपर्क क्रमांक बंद केले.अखेर छडा लागलाआरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी तीन वर्षांत अनेकदा प्रयत्न केले. मात्र, त्याचा छडा लागत नव्हता. अखेर काही दिवसांपूर्वी त्याने नवीन मोबाईल नंबर घेतल्याचे पोलिसांना कळले. त्याआधारे त्याचे लोकेशन काढून अंबाझरीचे पोलीस पथक बारडेज, नार्थ गोवा खुरुसावाडा येथे पोहचले. तेथून त्यांनी आरोपी सौरभला अटक करून नागपुरात आणले. न्यायालयाने त्याचा २४ नोव्हेंबरपर्यंत पीसीआर मंजूर केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस उपायुक्त विनिता साहू, सहायक आयुक्त राजेंद्र बोरावके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाझरीचे ठाणेदार विजय करे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकgoaगोवा