शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

महिलांवर अत्याचार नेमके कोण करतेय? किती छळ वाढला? पतीकडून नेमका कधी छळ होतो? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 14:55 IST

देशात ज्या काही बलात्काराच्या घटना घडतात त्यातील तब्बल ९६ टक्के प्रकरणात नातेवाईक, मित्र, शेजारी आणि अन्य ओळखीच्या लोकांकडून अत्याचार केले जातात. 

चंद्रकांत दडस, उपसंपादक

नातेवाईक हे प्रत्येक कुटुंबाची एक ताकद असते; मात्र हेच नातेवाईक, जवळचे मित्र आणि ओळखीतले लोक महिलांसाठी शत्रू ठरत आहेत. महिलांना त्यांच्यापासून धोका निर्माण झाला आहे. बलात्कार असो की छळ हा परक्या नव्हे तर आपल्याच लोकांकडून केला जात असेल तर महिलांना यापुढे अधिक सावध पावले टाकत ‘ते’ हात ओळखण्याची गरज आहे. आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात महिलांनी तोंड उघडण्याची गरज निर्माण झाली आहे.

किती छळ वाढला? - २०२१ मध्ये देशात तब्बल ४ लाख २८ हजार २७८ महिलांचा छळ अथवा अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या. २०२० च्या तुलनेत हे प्रमाण १५.३ टक्क्यांनी अधिक आहे. - २०२० मध्ये या प्रकरणांमध्ये ३,७१,५०१ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील सर्वाधिक गुन्हे (३१%) हे पती किंवा त्यांच्या नातेवाइकांकडून छळ केल्याची आहेत. महिला अपहरणाच्या १७ टक्के घटना देशात घडल्या आहेत.

शरीरावर ओरखडे -- देशात ज्या काही बलात्काराच्या घटना घडतात त्यातील तब्बल ९६ टक्के प्रकरणात नातेवाईक, मित्र, शेजारी आणि अन्य ओळखीच्या लोकांकडून अत्याचार केले जातात. - देशात बलात्काराच्या सर्वाधिक घटना राजस्थानमध्ये घडत असून, त्यापाठोपाठ मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडतात. - यातही १८ ते ३० वर्षांच्या महिलांवर ओरखडे ओढण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

पतीकडून नेमका कधी छळ होतो? -लग्न झाल्यानंतर नव्या नवरीचे नऊ दिवस अगदी मजेत जातात. सुरुवातीचे काही महिने गेल्यानंतर लगेच छळ करण्यास सुरुवात होते. लग्न झाल्यानंतर २ ते ४ वर्षांच्या काळात हे प्रमाण अधिक वाढते, तर १० वर्षांहून अधिक काळ छळ झालेल्या महिलांचे प्रमाण देशात २६ टक्के अधिक आहे. 

सर्वाधिक छळ कोणत्या राज्यात? -- महिलांवर भावनिक, शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार करण्याचे प्रमाण देशात ३१.९ टक्के आहे, तर कर्नाटक राज्यात सर्वाधिक (४८.४ टक्के) छळ केला जातो.- त्यापाठोपाठ बिहार (४२.५ टक्के), मणिपूर (४१.६ टक्के), तेलंगणा (४०.४ टक्के), उत्तर प्रदेश (३७.३ टक्के) येथे महिलांवर अत्याचाराचे प्रमाण अधिक आहे. - महाराष्ट्रामध्ये २८.२ टक्के महिलांचा छळ केला जातो. यातही लैंगिक छळ करणाऱ्या राज्यात कर्नाटक आघाडीवर असून, महाराष्ट्रात महिलांना मारहाणीचे प्रमाण २४.४ टक्के इतके आहे.

महिला तोंड उघडतात? -ज्या तरुणी अथवा महिलांवर शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार झाला आहे, त्या याबाबत कुणाकडेच अधिक बोलत नाहीत. त्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी कुणाचीही मदत न घेता निमूटपणे अत्याचार सहन करतात.

टॅग्स :MolestationविनयभंगWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी