शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलींवर..., जाणून घ्या काय होतं माफिया गुंडांचं 'ऑपरेशन जानू'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 11:13 IST2023-04-27T11:12:32+5:302023-04-27T11:13:41+5:30
अतिक आणि अश्रफ यांच्या गँगने अनेक गरीब मुस्लीम मुलींना आपल्या वासनेसाठी शिकार बनवले होते. काय होते त्यांचे 'ऑपरेशन जानू' जाणून घ्या...

शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलींवर..., जाणून घ्या काय होतं माफिया गुंडांचं 'ऑपरेशन जानू'
माफिया अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमदच्या हत्येनंतर, उत्तर प्रदेश पोलीस त्यांच्या गँगसंदर्भातील सर्वच गुन्ह्यांच्या फाइल्स ओपन करत आहेत. आता या माफिया फॅमिलीच्या आणखी एका ऑपरेशनचा खुलासा झाला आहे. अतिक आणि अश्रफ यांच्या गँगने अनेक गरीब मुस्लीम मुलींना आपल्या वासनेसाठी शिकार बनवले होते. काय होते त्यांचे 'ऑपरेशन जानू' जाणून घ्या...
अलाहाबाद येथील करेली येथे असलेल्या बालिका मदरशात शिकणाऱ्या काही मुलींवर 17 जानेवारी 2007 रोजी बलात्कार झाला होता. या घटनेनंतर या मुद्द्याची प्रचंड चर्चा झाली होती. या घटनेनंतर अश्रफला कधीही निवडणूक जिंकता आली नाही आणि त्याचे संपूर्ण राजकीय करिअर बर्बाद झाले. या मदरशातील तब्बल 16 गरीब विद्यार्थिनींवर अतिकच्या भावाने सामूहिक बलात्कार केला होता. मात्र या घटनेसंदर्भात सर्वकाही माहीत असूनही अतिक-अश्रफ यांच्या विरोधात कसल्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती.
अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार -
17 जानेवारीच्या या सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरला होता. मात्र या प्रकरणाच्या एफआयआरमध्ये बलात्कार या शब्दाचा कुठेही उल्लेख केला गेला नाही. या घटनेत बंदूकधाऱ्यांनी मदरशातून दोन अल्पवयीन मुलींना उचलून नेले होते. त्यांच्यावर रात्रभर बलात्कार करण्यात आला. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना रक्ताने माखलेल्या वस्थेत मदरशाच्या गेट समोर फेकण्यात आले होते.